आता पर्यटकांसाठी ताडोबाचे आणखी एक प्रवेशद्वार सुरू, व्याघ्रदर्शनासोबत बोटींगचाही आनंद

जितेंद्र सहारे
Sunday, 3 January 2021

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने पुन्हा नवीन प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चिमूर तालुक्‍यातील पळसगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बेलारा गोंडमोहाळी बफर प्रवेशद्वार नववर्षाच्या पर्वावर सुरू करण्यात आले.

चिमूर (जि. चंद्रपूर ) : हमखास व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पळसगाव  वनपरिक्षेत्रातील येणाऱ्या बेलारा गोंडमोहाळी येथे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार सुरू  करण्याचा निर्णय घेण्यात आला. नववर्षाला या पर्यटनद्वाराचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे गाव, परिसरातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. 

हेही वाचा - शेतकरी दाम्पत्य करीत होते काम; पतीचा आवाज येत नसल्याने पत्नीने जाऊन बघितले असता झाला...

वाघ व जैवविविधतेच्या दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक पर्यटकांना सफारीसाठी ताटकळत राहावे लागत होते. यामुळे पर्यटक निराश व्हायचे. ही बाब लक्षात घेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने पुन्हा नवीन प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चिमूर तालुक्‍यातील पळसगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बेलारा गोंडमोहाळी बफर प्रवेशद्वार नववर्षाच्या पर्वावर सुरू करण्यात आले.

हेही वाचा - गृहिणींची चिंता वाढली! थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो वगळता भाजीपाला वधारला

या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गावतलावत बोटिंगचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गाव व परिसरातील तरुणांना गाइड, जिप्सी, तिकीट काऊंटर आणि वॉचमन याच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. नववर्षाला प्रवेशद्वाराचा शुभारंभ पळसगाव वन परिक्षेत्र अधिकारी आर. एन. ठेमस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इको विकास समितीचे पदाधिकारी व सदस्य, वनविभागाचे कर्मचारी, गावकरी व पर्यटकांची उपस्थिती होती. यावेळेस गावातील गाइडला ट्रॅकसूट व गणवेश वाटप करण्यात आले. यासोबतच पळसगाव गेटमधून रात्रीची सफारीसुद्धा सुरू  झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tadoba new entry gate open at palasgaon in chimur of chandrapur