esakal | ...अन् तहसीलदारांची कर्तव्यभूमीप्रती कृतज्ञता सुसह्य करून गेली !
sakal

बोलून बातमी शोधा

bal.jpg

कर्तव्यभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संधीचे सोने करण्याचा एक आदर्श वस्तुपाठ एका प्रशासकीय अधिकाऱ्याने बुधवारी (ता.6) इतरांना घालून दिला.

...अन् तहसीलदारांची कर्तव्यभूमीप्रती कृतज्ञता सुसह्य करून गेली !

sakal_logo
By
अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि. अकोला) : कर्तव्यभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संधीचे सोने करण्याचा एक आदर्श वस्तुपाठ एका प्रशासकीय अधिकाऱ्याने बुधवारी (ता.6) इतरांना घालून दिला.

हेही वाचा-  धोका : एका नगरेवकासह 42 पॉझिटिव्ह, एकाच दिवसातील सर्वाधिक पॉझिटिव्ह अहवाल

अनेक प्रश्‍न होत डोळ्यासमोर उभे
8-10 वर्षांपूर्वी नायब तहसीलदार म्हणून प्रशासकीय सेवेची कारकीर्द मूर्तिजापूरातून सुरू करणारे विकास भालेराव सध्या पुणे जिल्ह्यातील हवेलीत तहसीलदार आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर घडवायला पुण्यात गेलेले तालुक्यातील गोरेगाव या छोट्याश्या गावातील चार युवक पुण्यात एका कंपनीत जॉब करून स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमधून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शस्त्रसज्ज होत लॉकडाउनचे आयुध उगारले. परिणामी आधी क्लासेस बंद झाले. मग कंपनीतील जॉब जाऊन त्यांचा रोजगार बंद झाला. त्यामुळे उपासमार होऊ लागली. पंकज बरडे, अक्षय लाखे, वैभव खराटे, आकाश बावने उज्वल भविष्याची स्वप्ने उरात घेऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात गेलेल्या या युवकांसमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले.

क्लिक करा- हे काय ? चक्क दोन पोलिसांमध्येच झाली फ्रिस्टाईल, एक होता वर्दीवर तर दुरसा सुटीवर

तलाठ्यांना सूचना देऊन तरुणांना केले सहकार्य
रहायचे ठीक आहे, पण उदरनिर्वाहाचे वांधे झाले. पुण्यात कोरोनाचा संसर्गाचा दर उच्च आहे. सर्व शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस बंद आहेत. सर्व छोट्या-मोठ्या कंपन्या बंद आहेत. काम करत असलेल्या कंपनीतील रोजगाराचा मार्ग बंद आणि ज्या उद्देशाने येथे आलो होतो ते कोचिंग क्लासेस बंद! अशा दुहेरी संकटाच्या कैचीत हे युवक सापडले. मग विचार मनात आला, ‘गड्या आपुला गाव बरा’! लगेच त्यांनी मोबाईल द्वारे त्यांच्या गावातील सरपंच व पोलिस पाटलांशी संपर्क साधला.

समाजभान जपणारे तलाठी संदीप बोळेंना हे कळले. लगेच बोळे यांना भालेराव सरांची आठवण झाली. सध्या हवेलीत तहसीलदार असणाऱ्या विकास भालेरावांसोबत ते मूर्तिजापूरात असतानाचे दिवस आठवले. आजही कायम असलेला संपर्क उपयोगी पडला. भालेराव सरांना कर्तव्यभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. संधीचे त्यांनी सोने केले. पुणे जिल्ह्यातील ज्या गावात हे विद्यार्थी वास्तव्यास होते, त्या गावातील तलाठी पलांडे यांना सूचित करून त्या तरुणांपर्यंत पोहोचण्यास सांगितले. मोहीम फत्ते झाली. अडचण सुटली. जेवणाची सोय झाली. लॉकडाउन सुसह्य झाला.