पंधरा लाख घ्या किंवा नोकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : ऊर्जा विभागातील अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना 15 लाख घ्या किंवा नोकरी असे दोन पर्याय उमेदवारांना देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण व महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अनेक वर्ष हा निर्णय प्रलंबित असल्यामुळे उमेदवारांची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित असणाऱ्यांना 15 लाख देऊन वन टाईम सेटलमेंट करावे किंवा त्वरित नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महावितरणमधील 1100 व महापारेषणमधील 222 इच्छुकांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. दोन्ही कंपनीच्या एकत्रित झालेल्या बैठकीत डिसेंबरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. बैठकीला ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद सिंह, मराविम कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरण चे संचालक (मानव संसाधन) पवनकुमार गंजू उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take fifteen lakh or a job