हा घ्या पुरावा! अमरावतीत वाहनातून केले सात लाख जप्त

file photo
file photo

अमरावती : आचारसंहितेच्या काळात रोकड जप्त करण्याची मालिका सुरूच असून तपासणी नाक्‍यावर सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक काळात बहुतांश ठिकाणी इनकॅमेरा वाहनांची तपासणी सुरू आहे.
अमरावती मार्गावर बायपासजवळ निवडणूक विभागातर्फे चांदूर रेल्वे येथे स्थिर निगराणी पथकाने गुरुवारी (ता. 17) रात्री 12.50 वाजता महिंद्रा एक्‍सयूव्ही वाहन थांबविले. हे वाहन धामणगाव रेल्वे येथील संदेश कुचेरिया यांच्या मालकीचे असून, वाहनाची तपासणी केली असता बॅगमध्ये 7 लाख 13 हजार 750 रुपये रोख रक्कम आढळून आली. त्यात दोन हजार रुपयाच्या 12 नोटा, दोनशे रुपयाच्या 119 नोटा, शंभर रुपयाच्या 763 नोटा, पाचशे रुपयाच्या 1162 नोटा व पाचशे रुपयाच्या 173 नोटा होत्या. ही रोकड धामणगाव रेल्वे येथील मेडिकल व्यवसायी गोपाल पुंडलिकराव लोंदे यांच्या दुकानाची असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांच्याकडे रकमेबाबत कुठलाही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे ही रक्कम पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आली. चांदूर रेल्वे येथील उपकोषागार कार्यालय येथे जमा करण्यात आली. ही कारवाई धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व पथक प्रमुख सतीश गोसावी यांच्या नेतृत्वात अनिल चौरे राजेश्वर मलमकार, योगेश वंजारी, पोलिस कर्मचारी महेश प्रसाद व 2 होमगार्ड यांनी केली.
विदेशी मद्यासह साड्या जप्त
चांदूररेल्वे मार्गावर एसआरपीएफ तपासणी नाक्‍यावर गुरुवारी (ता. 17) रात्री साडेअकरा ते पहाटे दोन वाजेदरम्यान निवडणूक विभाग व स्थानिक पोलिस यांनी एका कारची तपासणी केली. त्यात दोन बॅग आढळल्या. त्यात साड्या आढळल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. शिवाय कारच्या आतमध्ये दीड हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बॉटलसुद्धा होत्या. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com