पोटाची खळगी कशी भागवणार? तमाशा कलावंताचा प्रश्न

पोटाची खळगी कशी भागवणार? तमाशा कलावंताचा प्रश्न

बुलडाणा : आधुनिक कला, मनोरंजनाच्या साधण्याची दिवसेंदिवस वाढत असलेली क्रेझ आणि मोबाईलच्या युगात बसल्या ठिकाणी वाटेल ते पाहावयास मिळणारी सुविधा पाहता, महाराष्ट्रातील बर्‍याच लोककला हद्दपार झाल्या आहे. त्यातीलच एक तमाशा ही लोककला आहे. परंतु, पोटाच्या खेळगीला भरण्यासाठी गावोगावी बिर्‍हाड घेऊन तमाशा लावत लोककला जिवंत ठेवण्याचा जिद्द करणार्‍या कलावंतांवरच सोनाळा पोलिसांनी दंडुका उचल्यामुळे रसिकांसह सर्वच हवालदिल झाले आहेत. 

शासनाच्या वतीने तमाशा ही महाराष्ट्राची लोककला असून, या कलेव्दारे राज्यातील ग्रामीण भागात समाजप्रबोधन व लोकजागृती होत असते. तमाशा व लोकनाट्य हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा असल्याने विशेषत: ग्रामीण भागात तो दृढपणे रुजलेला आहे. यासाठी शासन वेगवेगळ निर्णय घेत असते.


आज शहरात तमाशा म्हणजे काय हे आज तरी माहित नसले तरी, गावोगावी ही कला जिवंत असून, रसिकही कायम आहेत. यातच यात्रा आणि उत्सवामध्ये बिर्‍हाडासह वास्तव्य करून पोट भरण्याचा कलावंतांचा संघर्ष हा अखेरची घटका मोजत आहे. अशातच, संत सोनाजी महाराज यांचेनिमित्त अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या करमणूकीसाठी येथे तब्बल 200 कलावंतांसह साहित्य आणि वाहने घेऊन सोनाळ्यात दाखल झाले. परंतु, पोलिसांनी फड लावण्यास मज्जाव करत वाहनांवर कारवाई केली तर, कलावंतांना धक्काबुक्की केल्याचा आरोप सुकन्याबाई बढे यांनी केला आहे. 

राज्यात एकदाच परवानगी काढण्याची गरज
शासनाच्या वतीने 12 जानेवारी 2006 च्या पत्राने लोकनाट्य व तमाशासाठी तिकीट विक्री परवाना शुल्क संपूर्ण वर्षाची एकदाच एक हजार इतकी आकारण्यात आली असून, सादरीकरण परवाना शुल्क हे प्रत्येक प्रयोगासाठी स्वतंत्रपणे न आकारता वर्षातून एकदाच एक हजार इतके आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शुल्काचा कालावधी हा 1 एप्रिल ते 31 मार्च असा असून, यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनाही कळविण्यात आले असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे एकदा भरलेले शुल्क हे संपूर्ण राज्यासाठी लागू राहणार असल्याचेही म्हटले आहे. 

ग्रामपंचायतकडून ना हरकत
संत सोनाजी महाराज यात्रेत 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या 3 दिवसासाठी आनंद लोककला मंचाला तमाशा खेळ करण्यासाठी विविध अटी व शर्तीच्या अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले आहे. यामुळे पोलिस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे संबंधितांना सांगितले आहे. 

त्या चित्रपटगृहावर कुणाचा वरदहस्त
यात्रेत मनोरंजन करण्याच्या दृष्टीने यंदा सोनाळ्यात तीन टुरिंग टॉकीज आहे. सदर टॉकिजला नियमाप्रमाणे तहसीलदार, संग्रामपूर यांच्याकडे मनोरंजन करण्यासंदर्भात परवानगी घेण्याची आवश्यकता असते. परंतु, तहसील कार्यालयाकडे कोणतीही परवानगी मागण्यात आले नसल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे. यामुळे सदर चित्रपटगृहावर कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल निर्माण केल्या जात आहे.

संत सोनाजी महाराज यात्रेनिमित्त मोठ्या संख्येत भाविक येत असतात, गेल्या काही वर्षांअगोदर तमाशा खेळादरम्यान, वाद होऊन मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर सलग चार ते पाच वर्षांपर्यंत तमाशा खेळाला सुरक्षिततेच्या कारणावरून परवानगी देण्यात आलेली नाही. यंदाही यात्रेतील कायदा व सुरक्षा पाहता परवानगी न देण्याचे ठरविण्यात आले होते. - किशोर जुनघरे, सपोनि, सोनाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com