नरहरी महाराजांच्या टपाल तिकिटासाठी लढाई

नागपूर : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मागणीच्या निवेदनातून संत नरहरी महाराजांचे छायाचित्र व नरहरी विजय ग्रंथ भेट देताना मुकुंद शहाणे, माधव आसरे, हरीभाऊ विंचुरकर, ओंकार मस्के, सचिन कावळे, अरविंद हाडे आणि इतर.
नागपूर : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मागणीच्या निवेदनातून संत नरहरी महाराजांचे छायाचित्र व नरहरी विजय ग्रंथ भेट देताना मुकुंद शहाणे, माधव आसरे, हरीभाऊ विंचुरकर, ओंकार मस्के, सचिन कावळे, अरविंद हाडे आणि इतर.

नागपूर : संत नरहरी महाराजांचे कर्तृत्व आणि समाजसेवेचे कार्य प्रकाशात यावे यासाठी टपाल तिकीट प्रकाशित करण्याची मागणी सोनार सेवा महासंघ आठ वर्षांपासून करीत आहे. मात्र त्यांच्या वाट्याला आश्‍वासनांच्या पलीकडे काहीच लागलेले नाही. विशेष म्हणजे या चळवळीचा मुख्य चेहरा आता 83 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे मागणी पूर्ण होण्यास अजून किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्‍न सोनार महासंघाने केला आहे.
11 जानेवारी 2011 ला सोनार सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद शहाणे यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली व संत नरहरी महाराजांचे टपाल तिकीट प्रसिद्ध व्हावे अशी इच्छा व्यक्‍त केली. त्यांच्या इच्छेला प्रतिभाताई पाटील यांनी होकार दिल्याने विशेष प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, दस्तऐवज, महाराजांचे संदर्भग्रंथ आणि जीवनचरित्र सोनार सेवा संघाने संकलित केले. त्यानंतर 12 मार्च 2012 ला दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली व मागणीचे अधिकृत निवेदन त्यांना सुपूर्द केले. गेल्या सात वर्षांत वारंवार दिल्ली दौरे आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी झाल्या. पण हाती काहीच लागलेले नाही. आतापर्यंत माजी खासदार विलास मुत्तेमवार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांनी मुकुंद शहाणे यांना तोंडी आश्‍वासन दिले असले तरी लेखी काहीच येत नसल्याने सोनार सेवा मंडळाचे सदस्य नाराज आहेत.
6 लाख 25 हजारांचे करायचे काय?
डाक विभागाच्या नियमांनुसार संत नरहरी महाराज टपाल तिकीट प्रकाशन समिती गठित झाली असून, 1 लाख 25 हजार तिकिटे विकत घेण्यासाठी 6 लाख 25 हजारांचा निधी तयार आहे. त्यातील 50 हजार रुपयांचा खर्च नरहरी माळवी सोनार संघ करणार आहे. मात्र होत काहीच नसल्याने गोळा झालेल्या निधीचे करायचे काय? असा प्रश्‍न सोनार सेवा मंडळाने विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com