शिक्षक नवरा, दोन मुले; मग का घ्यावा तिने असा टोकाचा निर्णय? 

गजानन वैद्य
Sunday, 19 July 2020

शनिवारी (ता.18) सकाळी तिचा मोठा मुलगा विराट (वय 7) हा आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. यावेळी घरी असलेल्या सविताने लहान मुलगा सम्राटला विष पाजून स्वतःही प्राशन केले.

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या निंगणूर अनंतवाडी (ता. उमरखेड) येथे माहेरी आलेल्या विवाहितेने आपल्या मुलाला विष पाजून नंतर स्वत:ही प्राशन केले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. 

सविता विशाल रणमले (वय 30) असे मृत विवाहितेचे नाव असून सम्राट विशाल रणमले (वय 4) असे मृत बालकाचे नाव आहे. सविताचा विवाह 8 वर्षांपूर्वी कुपटी (ता. माहूर) येथील शिक्षक विशाल रणमले यांच्यासोबत झाला होता. शुक्रवारी सविता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निंगणूर अनंतवाडी येथे वडिलांकडे आली होती. 

अवश्य वाचा- गोष्ट एका अनोख्या लग्नाची! अकाली वैध्यव्य आलेल्या सुनेचे सासरच झाले माहेर

शनिवारी (ता.18) सकाळी तिचा मोठा मुलगा विराट (वय 7) हा आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. यावेळी घरी असलेल्या सविताने लहान मुलगा सम्राटला विष पाजून स्वतःही प्राशन केले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच दोघांनाही फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. 

अवश्य वाचा- त्याची नजर पडली एका मुलाच्या आईवर; नंतर घडला हा प्रकार....

या घटनेची नोंद महागाव पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण बिटरगाव पोलिसांकडे पाठविले जाणार असल्याची माहिती महागाव पोलिसांनी दिले. विवाहितेने असे का केले, याचे कारण वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही. या घटनेमुळे निंगणूर अनंतवाडी या गावावर शोककळा पसरली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher husband, two children; So why should she make such an extreme decision?