भावी शिक्षकांची टीईटी परीक्षा 19 जानेवारीला; वेळापत्रक जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकरीकरिता टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. वर्षातून दोनवेळा या परीक्षेचे आयोजन करण्याचे अपेक्षित असले, तरी ती एकदाच होत आहे. यंदा ही परीक्षा 19 जानेवारीला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नंदोरी (जि. वर्धा)  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आठ नोव्हेंबरपासून प्रारंभही झाला आहे. 
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकरीकरिता टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. वर्षातून दोनवेळा या परीक्षेचे आयोजन करण्याचे अपेक्षित असले, तरी ती एकदाच होत आहे. यंदा ही परीक्षा 19 जानेवारीला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तसे वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर आहे. 

आतापर्यंत पाच परीक्षा 
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यानुसार 2013 ते 2018 पावेतो पाच टीईटी परीक्षा झाल्या आहेत. 2015 मध्ये पेपरफुट प्रकरणामुळे टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली होती. 

असे आहे वेळापत्रक 
1. ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची मुदत आठ ते 11 नोव्हेंबर 2019 
2. प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढण्याची मुदत चार ते 19 जानेवारी 2019 
3. टीईटी पेपर एक ः 19 जानेवारी 2020 (सकाळी 10.30 ते 1.00) 
4. टीईटी पेपर 2 ः 19 जानेवारी 2020 (दुपारी 2.00 ते सायंकाळी 4.30) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher TET Exam on January 19; Schedule release