दीड लाखावर शिक्षकांचे पगार रखडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : "शालार्थ'मध्ये एप्रिल महिन्यापासून तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील दीड लाखावर शिक्षकांचे पगार ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. ऑगस्ट महिन्याचे पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकांकडून 3 ते 7 तारखेनुसार पगार बिल मागविणे गरजेचे होते. मात्र, दोन आठवडे वेतन अधीक्षकांनी बैठकांचे कारण देत, 27 ते 29 दरम्यान वेतन बिले मागविल्याने ऑगस्ट महिन्याचा पगार अद्यापही शिक्षकांना मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार मिळावा, यासाठी ऑनलाइन बिल स्वीकारण्यासाठी "शालार्थ'प्रणाली सुरू करण्यात आली. यानुसार मुख्याध्यापकांकडून पहिल्या आठवड्यात ऑनलाइन बिल सादर केल्यावर, एक तारखेला पगार जमा व्हायचा. एप्रिल महिन्यापर्यंत शालार्थ प्रणाली व्यवस्थितपणे काम करीत होती. मात्र, त्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने विभागाकडून ऑफलाइन बिले स्वीकारण्यात येत होती. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यातील वेतन अधीक्षकांच्या बैठका मुंबईला घेण्यात आल्यात. या बैठकीमध्ये वेतन ऑनलाइन करायचे की ऑफलाइन यावर बराच खल झाला. मात्र, यादरम्यान वेतन अधीक्षक नसल्याने ऑनलाइन वा ऑफलाइन बिल सादर करावे याबद्दल मुख्याध्यापकांमध्येही संभ्रमावस्था होती. त्यामुळे त्यांनी बिलच सादर केले नाही. बैठकीनंतर शेवटल्या आठवड्यात वेतन अधीक्षकांकडून ऑफलाइन बिल सादर करण्याची सूचना देण्यात आली. आता विभागात बिलांचा गठ्ठा असून वेतन देताना ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. मात्र, या प्रकाराने शिक्षकांचे एलआयसी आणि बॅंकेच्या हप्ते रखडले असून एक तारखेला पगार देण्याच्या योजनेचा फज्जा उडाला आहे. तसेच सरकारच्या ऑनलाइन पगार देण्याच्या घोषणेची पोल खुलली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers salary was kept at 1.5 lakh