समाजकार्य महाविद्यालयाची चमू कोल्हापूर-सांगलीला जाणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

यवतमाळ : गुजरात भूकंप, तामिळनाडूमध्ये आलेली त्सुनामी, बिहार तसेच केरळमधील महापुरानंतर आता सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी कोल्हापूर-सांगली येथील जलप्रलय परिस्थितीत मदतीचा हात देणार आहेत. महाविद्यालयाचे 95 विद्यार्थी मंगळवारी (ता. 13) सांगली-कोल्हापूरसाठी रवाना होणार असल्याची माहिती समाजकार्य महाविद्यालयाचे मदत पथकप्रमुख प्रा. घनशाम दरणे यांनी शनिवारी (ता.10) महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मीनल जगताप उपस्थित होत्या. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सध्या उद्‌भवलेल्या जलप्रलय परिस्थितीत मदत करण्यासाठी सावित्री जोतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयाची चमू जाणार आहे. तत्पूर्वी रविवारी (ता. 11) सकाळी नऊपासून शहरात मदतफेरी काढण्यात येणार आहे. शहरातील ज्या नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची आहे. त्याच्यापर्यंत ही चमू पोहोचणार आहे. शिवाय, शहरातील आठ ठिकाणी मदत साहित्य स्वीकारण्यासाठी केंद्र तयार करण्यात आले आहे.
यात ओम व्यायाम शाळा, सेवा ऍटोडील, साईश्रद्धा हॉस्पिटल, रामनाथ ट्रॅक्‍टर्स, मॉ दुर्गा दवाबाजार, हॉटेल-शहा-ए-आलम तसेच सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या भागात कार्य करणार आहे. वैद्यकीय चमू, प्रशासनाची मदत, मदतीचे वर्गीकरण आदी कामे करणार असल्याची माहिती प्रा. दरणे यांनी दिली.
चार भागात मदतफेरी
कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी शहरातून मदत स्वीकारली जाणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. 11) शहराच्या चारही भागांत वेगवेगळी मदतफेरी काढली जाणार आहे. यात नागरिकांनी सहभागी होत "फुल नाही, फुलाची पाकळी'मदत करावी असे आवाहन प्रा.डॉ. रमाकांत कोलते, प्रा. धनश्‍याम दरणे यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The team of Social Work College will be going to Kolhapur-Sangli