फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; पिकाला आग लावण्याची वेळ

फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; पिकाला आग लावण्याची वेळ
Updated on: 

यवतमाळ : फळ उत्पादक शेतकऱ्यांना (farmers) सतत आर्थिक नुकसानीचा धक्का सहन करावा लागत आहे. तरीही निराश न होता, शेतकरी न थकता, न थांबता शेतात राबत आहेत. मेहनतीला फळ येत असताना कोरोनाच्या (coronavirus) कडक निर्बंधात गाळलेल्या घामाचे पाणी होत आहे. शेतात पिकविलेला माल विक्रीला येत असताना व्यापारी खरेदीकडे पाठ दाखवीत आहेत. काही व्यापारी कवडीमोल भावात शेतमाल खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. (Tears in the eyes of fruit growers; Yavatmal Farmers news)

पांढरकवडा तालुक्‍यातील खैरगाव या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी फळउत्पादन घेतात. श्रीकृष्ण देशट्टीवार यांच्याकडे चार एकर केळी, पाच एकर टरबूज व तीन एकरावर लिंबू लागवड केली. मात्र, आता व्यापारी शेतात तोडणीस जाण्यास व तयार माल नेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. कडक निर्बंध व बाजूच्या राज्यातील लॉकडाऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील माल कुणी घेण्यास तयार नसल्याने देशट्टीवार यांनी शेतातील केळी पिकांना काढून पेटवून दिले आहे.

फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; पिकाला आग लावण्याची वेळ
कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

व्यापारी केळी उचलत नाही. त्यामुळे केळी पिवळी पडली, कुठे गळून पडली आहे. हीच परिस्थिती केळीप्रमाणे टरबूज व निंबूचीदेखील झाली आहे. हजारो रुपये शेतकऱ्यांनी शेतात खर्च केला, आता व्यापारी उत्पादित माल नेण्यास तयार होत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडले आहेत. याच भागातील महेंद्र नैताम यांनीसुद्धा तीन एकरावर टरबुजाची लागवड केली. मात्र, त्यांचाही माल नेण्यास व्यापारी तयार नाहीत. श्रीनिवास शिवणवार यांनीसुद्धा चार एकरावर टरबूज लागवड केलेली आहे. मात्र, त्यालाही नेण्यास कुणी व्यापारी तयार नाहीत. त्यामुळे टरबूज शेतात सडून जात आहे. खैरगाव परिसरातील साधारण ४० एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली. त्या सर्वांची अशीच विदारक अवस्था झालेली आहे.

चार एकरांत टरबुजाची लागवड केली. आता तीन रुपये प्रतिकिलो भाव देण्यास व्यापारी तयार नाहीत. संचारबंदीपूर्वी सात ते आठ व्यापारी दिवसाला शेतात यायचे. आता कुणीही खरेदीसाठी येत नाहीत.
- श्रीनिवास शिवणवार, शेतकरी, खैरगाव
फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; पिकाला आग लावण्याची वेळ
विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत
केळी, टरबूज व लिंबू पिकांची लागवड केली. मात्र, आता व्यापारी शेतात तोडणीस व निर्यातीसाठी तयार माल नेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती परिसरातील इतरही शेतकऱ्यांची झालेली आहे.
- श्रीकृष्ण देशट्टीवार, शेतकरी, खैरगाव पांढरकवडा, जि. यवतमाळ

(Tears in the eyes of fruit growers; Yavatmal Farmers news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com