esakal | तहसिलदार आणि नायब तहसिलदार संघटना ‘अ‍ॅक्शनमोड‘वर; 15 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Tehsildar and Deputy tehsildar are protesting in Yavatmal

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात वाळूमाफियांनी नायब तहसिलदार, तलाठ्यावर हल्ला केला होता. यात नायब तहसिलदार यांचेवर नांदेड रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दोषीवर कारवाईच्यामागणीसाठी तहसिलदार,नायब तहसिलदार संघटनेने27 ते 29 जानेवारी तीन दिवस कामबंद आंदोलन केले. घटनाहोवनू दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे. 

तहसिलदार आणि नायब तहसिलदार संघटना ‘अ‍ॅक्शनमोड‘वर; 15 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर वाळूमाफियांनी केलेल्या प्राणघातक हल्लानंतरही मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळेच आता राज्यातील तहसिलदार,नायब तहसिलदार संघटना अ‍ॅक्शनमोड मध्ये आली आहे. मंगळवार (ता.दोन) एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन केले असून कारवाई न झाल्यास 15 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा - "ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या"; अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल 

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात वाळूमाफियांनी नायब तहसिलदार, तलाठ्यावर हल्ला केला होता. यात नायब तहसिलदार यांचेवर नांदेड रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दोषीवर कारवाईच्यामागणीसाठी तहसिलदार,नायब तहसिलदार संघटनेने27 ते 29 जानेवारी तीन दिवस कामबंद आंदोलन केले. घटनाहोवनू दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे. 

अजूनही मुख्य आरोपी अविनाश चव्हाण रा.उमरखेड याला अटक करण्यात आलेली नाही. मुख्य आरोपीला अटक करण्यात यावे या मागणीसाठी तहसिलदार,नायब तहसिलदार संघटनेने राज्यव्यापी आंदोलन छेडले. मंगळवार (ता.दोन) सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार तसेच तलाठी सामुहिक रजा आंदोलन केले. प्रमुख मागणीचे निवेदन तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष तथा यवतमाळ तहसिलदार कुणाल झाल्टे, एकनाथ बिजवे, रुपाली बेहरे, राजेश चिंचोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या ट्विटने खळबळ; काँग्रेसवरच घेतला अन्याय होत असल्याचा संशय

उपजिल्हाधिकारी संघटनेचा पाठिंबा

वाळूमाफियांनी नायब तहसिलदार व तलाठी यांचेवर केलेल्या हल्याचा निषेध महसूूलच्या सर्वच संघटनांनी केला आहे. तलाठी संघटनेनेनंतर विदर्भ मुलकी संघटना तसेच महसुल कर्मचारी संघटना, विदर्भ मंडळ अधिकारी संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ