विदर्भावर सूर्यदेवाचा प्रकोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

चंद्रपूर 46.2, ब्रह्मपुरी 46 अंशांवर

चंद्रपूर 46.2, ब्रह्मपुरी 46 अंशांवर
नागपूर - विदर्भात सूर्यदेवाचा प्रकोप सुरूच असून, नागपूरसह सर्वच शहरे उन्हाच्या तीव्र लाटेखाली आले आहेत. गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उष्ण लाटेचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मेच्या पूर्वार्धात ऊन-पावसाचा खेळ चालल्यानंतर उत्तरार्धात अचानक उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाच्या लाटेने विदर्भालाच कवेत घेतले आहे. उन्हाचे सर्वाधिक चटके चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीवासींना बसले. चंद्रपुरात कमाल तापमान 46.2 अंशांवर गेले, तर ब्रह्मपुरी येथेही पाऱ्याने छेचाळिशी पार केली. उपराजधानीतही पारा 45 अंशांवर गेला. बुलडाणा (40.5 अंश सेल्सिअस) आणि वाशीम (41.2 अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच शहरांना उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
Web Title: temperature increase in vidarbha