चिमूरच्या श्री बालाजीचे मंदिर उघडून पुन्हा झाले बंद; मंदिरातील कर्मचारी आढळला कोरोना पॉझिटिव्ह 

जितेंद्र सहारे
Saturday, 21 November 2020

कोविड -१९ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात रोखण्या करीता देशभर टाळेबंदी घोषीत करण्यात आली.ह्यात देशातील सर्व धर्मीयांचे प्रार्थना स्थळेही बंद करण्यात आली. टाळेबंदीच्या शिथीलतेनंतर देशातील प्राथणा स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चिमूर (जि. चंद्रपूर)  : राज्य शासनाने १६ नोव्हेंबर पासुन राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे काही अटी शर्तिच्या अधीन राहून भक्तांकरीता खुली करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा प्रमाणे चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी मंदिर सुरू करण्यात आले. मात्र मंदिरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मंदीर बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

कोविड -१९ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात रोखण्या करीता देशभर टाळेबंदी घोषीत करण्यात आली.ह्यात देशातील सर्व धर्मीयांचे प्रार्थना स्थळेही बंद करण्यात आली. टाळेबंदीच्या शिथीलतेनंतर देशातील प्राथणा स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

मात्र महाराष्ट्र शासणाने उशीरा मंदीरे, देवस्थाने, मशीद, चर्च व विहार इत्यादी प्राथणास्थळे भक्ता करीता १६ नोहेम्बंरला सुरू करण्याचा निर्णय दिला.शासणाच्या निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी शर्तिच्या अधिन राहून प्रार्थना स्थळे सुरू करण्यास मंजुरी दिली.

चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान सुद्धा शासणाने घालुन दिलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहूण मंदीर सुरू केले. मात्र अवघ्या पाच दिवसानेच मंदीरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मंदीर बंद करण्याचा निर्णय विश्वस्त संचालकाच मंडळाने एकमताने घेतला.

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी व त्याचा अहवाल आल्यावरच मंदीर चालु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामूळे श्रीहरी बालाजींच्या सर्व भक्तांनी सहकार्य करावे.
डॉ. मंगेश भलमे
अध्यक्ष,श्रीहरी बालाजी देवस्थान संचालक मंडळ, चिमूर

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temple closed as worker in Chimur balaji temple tested corona positive