विद्यापीठांमध्ये मिळणार ‘टेम्पल मॅनेजमेंट’चे धडे

मंगेश गोमासे
रविवार, 25 डिसेंबर 2016

नागपूर - मंदिरातील देणग्या, खर्चाचे नियोजन, मंदिराचा विकास तसेच भाविकांना योग्य सोयीसुविधा मिळाव्या याकरिता मंदिर व्यवस्थापनास धडे देण्यासाठी ‘टेंपल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाची निर्मिती केली जात आहे.

देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा सेवा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे हे या अभ्यासक्रमाची आखणी करीत आहेत. या संदर्भात तीन विद्यापीठांशी त्यांचे बोलणे झाले असून लवकरच हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. 

शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या इन्स्पायर शिबिराच्या समारोपासाठी ते नागपूरला आले होते. यावेळी ‘सकाळ’सोबत बोलताना हावरे यांनी अभ्याक्रमाविषयी माहिती दिली. लाखो भाविक दररोज श्रद्धेने ठिकठिकाणी देवदर्शनाला जातात. बऱ्याच ठिकाणी निवास व भोजनाची चांगली व्यवस्था नसते. काही मंदिरांमध्ये जागा अपुरी असल्याने भाविकांची गैरसोय होते. दर्शनासाठी लांबच-लांब रांगा लागतात. प्रसंगी चेंगराचेंगरीसुद्धा होते. मांढरा देवी, केरळ येथील साबरीमाला यात्रेदरम्यान झालेली चेंगराचेंगरी ही नियोजनाअभावीच झाली. 

आज मंदिरांच्या दाणपेट्यांमधून कोट्यवधी रुपये मंदिर व्यवस्थापनाकडे जमा होतात. त्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

या निधीचा योग्य वापर करून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. शिर्डीसह शेगावचे श्री गजानन संस्थान, तिरुपती बालाजी संस्थान याचे उत्तम उदाहरण आहेत. अमरावतीचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याशी चर्चा करून एक अभ्यासक्रम तयार करण्याची सहमती झाली असल्याचे सुरेश हावरे यांनी सांगितले. 
 
पौरोहित्याला प्रतिष्ठा मिळावी
‘पौरोहित्य’ या व्यवसायाला जी प्रतिष्ठा मिळायला हवी ती मिळालेली नाही. व्यवसाय म्हणून कुणीही त्याचा अंगिकार करणार नाही. मात्र, यापुढे मंदिरांचे व्यवस्थापन करणे, त्यातून अशा घटनांना आळा घालणे, शिवाय विविध खात्यातून मंदिराचा विकास करणे याकरिता विद्यापीठांमध्ये ‘टेम्पल व्यवस्थापन’ या नावाने विद्यापीठांनी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस सुरेश हावरे यांनी व्यक्त केला. 

मंदिरांची उलाढाल मोठी आहे. त्या तुलनेत मंदिराचा विकास झाल्याचे दिसत नाही. भाविकांच्या सुविधांसाठी देणग्यांचे योग्य व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. याकरिता अभ्यासक्रमाची गरज आहे. 
- सुरेश हावरे, अध्यक्ष, साईबाबा सेवा संस्था, शिर्डी

Web Title: temple management learning in university