esakal | नात्याला काळीमा : मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला दहा वर्षांची सक्तमजुरी

बोलून बातमी शोधा

Ten years forfeit for father abusing daughter

१२ जानेवारी २०१९ रोजी पीडिता आजीकडे गेली. त्यानंतर १९ जानेवारीला आरोपी पिता हा तिला परत आणण्यासाठी गेला, तेव्हा तिने नकार दिला. त्यावेळी पित्याने तिला मारहाण केली.

नात्याला काळीमा : मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला दहा वर्षांची सक्तमजुरी

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी अडगाव येथील आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मोर्शी तालुक्‍यातील अडगाव येथील पीडिता ही तिसऱ्या वर्गात शिकत होती. तिचा वडील हा संधी साधून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. विशेष म्हणजे, अनेक वर्षे हा प्रकार चालत राहिला. वडील आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते, अशी तक्रार पीडित मुलीने केली होती.

१२ जानेवारी २०१९ रोजी पीडिता आजीकडे गेली. त्यानंतर १९ जानेवारीला आरोपी पिता हा तिला परत आणण्यासाठी गेला, तेव्हा तिने नकार दिला. त्यावेळी पित्याने तिला मारहाण केली. पीडित मुलीने तिच्यावरील अत्याचाराबाबतची माहिती आजीला दिली. त्यामुळे आजीने पीडितेसोबत जाऊन शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

दुचाकीवर आलेल्या चौघांनी मुलांना नेले पडक्या विहिरीकडे तर मुलींना दूर नेत केले अश्‍लील चाळे

याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रीना कोरडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. याप्रकरणातील साक्षीदार व पुरावे ग्राह्य मानून न्यायमूर्ती एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज इंगळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून वानखडे यांनी सहकार्य केले.