अपहरणप्रकरणी आरोपीला दहा वर्षे कारावास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी ज्ञानेश्‍वर आखाडू मौजे (52, रा. हिंगणा) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडितेचे वडील हे शेतमजूर असून, तिला भाऊ व बहीण आहे. ही घटना 16 जानेवारी 2014 रोजी घडली. पीडित दहावीमध्ये शिकते. आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा होता. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या घरी येणे-जाणे होते. ओळखीचा फायदा घेऊन ज्ञानेश्‍वरने मुलीला फूस लावल्याचा आरोप वडिलांनी केला. घटनेच्या दिवशी पीडित फोटो काढून येते, असे सांगून बाहेर गेली, ती परत आलीच नाही. तिचा शोध घेतल्यानंतरही सापडली नाही.

नागपूर - सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी ज्ञानेश्‍वर आखाडू मौजे (52, रा. हिंगणा) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडितेचे वडील हे शेतमजूर असून, तिला भाऊ व बहीण आहे. ही घटना 16 जानेवारी 2014 रोजी घडली. पीडित दहावीमध्ये शिकते. आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा होता. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या घरी येणे-जाणे होते. ओळखीचा फायदा घेऊन ज्ञानेश्‍वरने मुलीला फूस लावल्याचा आरोप वडिलांनी केला. घटनेच्या दिवशी पीडित फोटो काढून येते, असे सांगून बाहेर गेली, ती परत आलीच नाही. तिचा शोध घेतल्यानंतरही सापडली नाही. त्यामुळे वडिलांनी हिंगणा पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्‍वरवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहायक सरकारी वकील ज्योती वजानी यांनी सरकारची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायाधीश के. जी. राठी यांनी नमूद शिक्षा सुनावली. 

Web Title: Ten years imprisonment to the accused