बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

File photo
File photo

यवतमाळ : लग्नाचे आमिष दाखवून बालिकेला पळवून नेणाऱ्या व वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा व दंड ठोठावला आहे. येथील जिल्हा न्यायाधीश एम. मोहिऊद्दीन एम. ए. यांनी गुरुवारी (ता.22) हा निकाल दिला.
राळेगाव तालुक्‍यातील एकुर्ली येथील रहिवासी नितीन सोनटक्के असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घाटंजी तालुक्‍यातील एकुर्ली येथील एका बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून त्याने पळवून नेले व तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तीन जून 2017ला घाटंजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तक्रारकर्तीच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, पाच साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांच्या साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दहा वर्षांची शिक्षा व 1 हजार 700 रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपास अधिकारी दत्ताजी जाधव, पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून जमादार दादाराव गेडाम, एएसआय दत्तात्रेय मेश्राम यांनी मदत केली. या प्रकरणात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील ऍड. मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com