मॉडेल मिल चाळीतील शिकस्त भाग पाडण्यावरून तणाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

नागपूर : सुमारे शंभर वर्षे जुन्या मॉडेल मील चाळ शिकस्त झाली आहे. विशेषत: वरच्या माळ्यावरील बराच भाग मोडकळीस आला आहे. कोणत्याही क्षणी भिंती कोसळण्याची शक्‍यता आहे. महापालिकेतर्फे मंगळवारी जीर्ण भाग पाडण्याची कारवाई करण्यात येणार होती. परंतु, पथक दाखल होताच स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध दर्शविण्यासोबतच तांत्रिक बाबीही उपस्थित करण्यात आल्या. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रहिवाशांचा वाढता रोष लक्षात घेऊन करवाईसाठी पुन्हा येण्याचा इशारा देत पथक आल्या पावली परतले.

दरवर्षी पावसाळ्यातच येथील रहिवाशांना नोटीस बजावून घरे रिकामी करण्याची नोटीस दिली जाते. तिच मालिका यंदासुद्धा कायम राहिली. घर एकदा रिकामे केल्यास पुन्हा हक्काचे घर मिळणे नाही, अशी रहिवाशांची धारणा असल्याने ते घर सोडून जायला तयार नाहीत. मंगळवारी दुपारी महापालिकेचे पथक सहायक आयुक्त अशोक पाटील आणि धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्या नेतृत्वात दाखल झाले. त्यांनी रहिवाशांसोबत चर्चा करण्यास सुरुवात करताच रोष निर्माण झाला. यानंतर धोकादायक भाग स्वत: पाडा किंवा आठवडाभराने पुन्हा कारवाई करून असा दम देत पथक परतले. केवळ कुणीही राहत नसलेल्या भागातील एक अगदीच जरजर भिंत पाडून पथकाने कारवाईची औपचारिकता पार पाडली. अपुरे पोलिस कर्मचारी हेसुद्धा कारवाई टाळण्यामागील एक कारण ठरले.
मॉडेल मिल सुरू होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय म्हणून सुमारे वर्षभरा पूर्वी मॉडेल मिल चाळची उभारणी करण्यात आली. मील बंद होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला असला तरी कामगारांचे कुटूंबिय येथे वास्तव्यास आहेत. इमारतीच्या पडझडीमुळे अनेक कुटूंबांनी बस्थान हलविले. पण, अजुनही सुमारे 170 कुटूंब इमारतीत तळ ठोकून आहेत. दरम्यान, कामगारांनी राहत असलेल्या जागेवर घरे मिळण्यासाठी लढा उभारला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेसुद्धा कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी तिच जागा देण्याचे निर्देश नॅशनल टेक्‍साईल कॉर्पोरेशनला दिले होते. या आदेशाला एक तपाहूनही अधिकचा काळ लोटला आहे. केवळ निविदा काढून गाळ्यांच्या कामाचे कंत्राट देण्यात आले. त्यावेळी कंत्राटदार बिल्डरने दीड वर्षात गाळे बांधून देण्याची ग्वाही दिली होती. परंतु, अनेक वर्षांचा काळ लोटूनही त्याने घर बांधून दिले नाही. यामुळेच शिकस्त घरात राहण्याची वेळ येथील रहिवाश्‍यांवर आली आहे. तात्पूरती डागडज्जीकरून कामगारांचे कुटूंब येथे वास्तव्यास आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tention on model mill