भयंकर! पत्नीला रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अंगावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी धाव घेत महिलेचा जीव वाचविला. एमआयडीसी पोलिसांनी पती अनिल हंसराज उईकेविरुद्ध (29, रा. इंदिरा मातानगर) खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरती उईके (29) असे जखमीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा एमआयडीसी परिसरातील खासगी कंपनीत नोकरीवर आहे. दोघांसोबत अनिलचे आईवडीलही राहतात. त्यांचे 20 मे 2019 रोजी लग्न झाले. लग्नानंतर अनिल वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. 26 सप्टेंबर 2019 रोजी अनिलचे आईवडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. अनिलने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दोघांमध्ये वाद झाला. अनिलने शिवीगाळ सुरू केली. आरतीने शिवीगाळ थांबविण्याची तंबी देताच संतप्त अनिलने रॉकेल ओतून पेटवले. आग लागल्याने आरतीने आरडाओरड सुरू केली. शेजाऱ्यांनी धाव घेत तातडीने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. उपचारासाठी आरतीला मेडिकलमध्ये भरती केले आहे. घरच्यांच्या दबावामुळे सुरुवातीला आरतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. परंतु, तक्रार दिल्यावर या घटनेची माहिती पुढे आली. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrible! Attempts to convince a wife to throw a kerchief at her