भयंकर! लग्नाचे आमिष दाखवून सात दिवस अत्याचार

file photo
file photo

कामठी (जि. नागपूर) : फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या विवाहित तरुणाने अविवाहित असल्याची बतावणी करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवीत सतत सात दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. कामठी पोलिसांनी 20 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी इस्तगाव, वरुड निवासी अंकित मनोज पखाले (वय 24) आहे.
अंकित एका मायक्रो फायनान्स कंपनीत काम करतो. पीडित तरुणीने आयटीआय केले असून, कामाच्या शोधात होती. कर्जाच्या संबंधात दोन वर्षांपूर्वी अंकित तिच्या घरी आला होता. तेव्हापासून त्याचे सतत तिच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान, त्याने पीडितेशी मैत्री गाठली. अविवाहित असल्याचे सांगून पीडितेला प्रेमपाशात अडकविले. 2 सप्टेंबरला अंकितने पीडितेला लग्नाची मागणी घालून सोबत येण्यास सांगितले. तरुणीने कुटुंबीयांना सांगितले की, मैत्रिणीकडे लग्न समारंभ असल्याने ती काही दिवसांसाठी तिच्या घरी राहायला जात आहे. अंकितने तिला आपल्या कोराडीच्या महादुला येथील भाड्याच्या घरी आणले. घरमालकाला सांगितले की, ती त्याची पत्नी आहे. सात दिवसांपर्यंत अंकितने पीडितेचे लैंगिक शोषण केले. 9 सप्टेंबरला मध्यरात्री तो अचानक घरून पसार झाला. पीडिता त्याची प्रतीक्षा करीत राहिली; मात्र तो परतला नाही. त्याचा फोनही बंद होता. अखेर तिने कोराडी पोलिस ठाणे गाठले. कोराडी पोलिसांनी तिला नवीन कामठी ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. ठाणेदार संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जितेंद्र राऊत यांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी अंकितचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com