भयंकर! मौजमजा करण्यासाठी वाहनांची चोरी

file photo
file photo

नागपूर : शहरात रात्री रेकी करून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने छडा लावला. टोळीच्या म्होरक्‍या आदेश ऊर्फ आट्या दुर्गादास तिरपुडे (20, रा. सिद्धार्थनगर, कोराडी) याला पोलिसांनी अटक केली असून, 17 वर्षांच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही टोळी दारू, गांजा, ढाब्यावर जेवण, मित्रांसह पार्ट्या आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करीत होती.
नऊ जानेवारी 2019 रोजी राजेश्‍वर डोमाजी कडू (52, रा. प्रशांत कॉलनी, बोरगाव) यांनी दुचाकी दुकानासमोर ठेवली होती. रात्री दुचाकी चोरून गेली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. आरोपी आदेश ऊर्फ आट्याने गिट्टीखदानसह इतर परिसरातूनदेखील दुचाकी चोरल्या. या दुचाकींची त्याने मुलताई (म.प्र.) आणि नागपूर ग्रामीण परिसरात विक्री केली होती.
तीन दिवसांपूर्वी आदेश उर्फ आट्या हा चोरीचे वाहन घेऊन मुलताई येथे आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक ताकसांडे यांना मिळाली. पथकासह ते मुलताईला गेले आणि आदेशला ताब्यात घेतले. नागपुरात आणून सखोल चौकशी केली असता त्याने नागपुरातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने कोराडी येथून चार, मानकापूर येथून तीन, गिट्टीखदान, प्रतापनगर, जरीपटका, सदर, अंबाझरी आणि खापरखेडा येथून प्रत्येकी एक वाहन असे 13 वाहने चोरल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com