बेल्लापार परिसरात वाघाची दहशत, वाघाने शेळ्या केल्या फस्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नांद, (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील झमकोली गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या 
बेल्लापार येथील गोठ्यात बांधून आसलेल्या दोन शेळ्या फस्त केल्या. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेनंतर बेल्लापार परिसरात वाघाची दहशत वाढली आहे. 

बेल्लापार येथील अशोक दोडके यांच्या घराला लागून शेळ्यांचा गोठा आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी गोठ्यात नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या. रात्री वाघाने गोठ्यात प्रवेश करून त्यातील दोन शेळ्या ठार केल्या. त्यापैकी एक शेळी दाव्याने बांधुन असुन तिला ठार केले तर दुसरीला ठार करून गावालगत गायकवाड यांच्या शेताकडे घेऊन गेला. घटनेची माहिती पाटील यांनी वनविभागाला दिली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 
झमकोली, बेल्लापार भिवी ही गावे जंगलाने व्यापलेली आहेत. या परिसरात नेहमीच वाघ दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय पाळीव प्राण्याची शिकार केल्याच्याही घटना घडल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terror of tigers in Bellapara area;

टॅग्स