सहा जिल्ह्यांत उभारणार टेक्‍स्टाइल पार्क - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

दिग्रस (जि. यवतमाळ) - कर्जातून शेतकरी समृद्ध झाला; तरच बॅंकांच्या पीककर्जाला अर्थ राहील. स्थानिक पातळीवर कापसावर प्रक्रिया उद्योग नाहीत. परिणामी कापसाला भाव मिळत नाही. नफा दलालांच्या घशात जातो. दलाल ही संकल्पना मोडीत काढून बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात यावी, या दृष्टीने पश्‍चिम विदर्भातील कापूस उत्पादक सहा जिल्ह्यांत टेक्‍स्टाइल्स पार्क उभारू, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

शनिवारी (ता. २८) दिग्रस येथील चंद्रशेखर पाटील जिनिंगच्या प्रांगणात माजी मंत्री संजय देशमुख मित्र परिवारातर्फे आयोजित भाजपप्रवेश मेळाव्यात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, भाजप राज्यात सत्तेत आल्यावर पहिली दोन वर्षे दुष्काळाचा सामना करण्यात गेली. राज्यातील ४० हजार गावांपैकी २७ हजार गावांत दुष्काळ होता. दुसरीकडे राज्याची तिजोरी रिकामी होती. आगामी पाच वर्षांत राज्यातील २० हजार गावांना दुष्काळमुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला आहे. पहिल्याच वर्षी साडेसहा लाख क्षेत्र सिंचनाखाली येईल. एवढी जलयुक्त शिवाराची कामे जनतेच्या सहकार्याने राज्यात झाली. अमरावती औद्योगिक वसाहतीत टेक्‍स्टाइल्स पार्कचे काम पूर्ण झाले. १८ उद्योग येऊ घातले आहेत. वर्ध्यात टेक्‍स्टाइल्स पार्कचे काम प्रगतिपथावर आहे. यवतमाळ, खामगाव, बुलडाणा, अकोला आदी ठिकाणीही लवकरच टेक्‍स्टाइल्स पार्क उभारले जाणार आहेत. भाजपचे सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित करणारा अर्थसंकल्प मांडणारे पहिले सरकार असल्याचे मदन येरावार यांनी सांगितले.

शेती सुधारणेसाठी समृद्धी प्रकल्प
भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर प्रथमच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपण जागतिक बॅंकेला शेती सुधारणेसाठी कर्ज मागितले. जागतिक बॅंकेनेही पाच हजार कोटींचे कर्ज मंजूर केले. नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Web Title: textile park in six district