कापड व्यापाऱ्याची पावणेदोन कोटींनी फसवणूक 

कापड व्यापाऱ्याची पावणेदोन कोटींनी फसवणूक 

नागपूर - शहरातील दलालाच्या माध्यमातून तमिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांनी नागपुरातील व्यावसायिक भूपेंद्र रमेशलाल केवलरामानी (41, रा. मिसाळ ले-आउट, जरीपटका) यांची 1.76 कोटींनी फसवणूक केली. तहसील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये मोहन सुंदरम टी उर्फ बाबू (32, रा. त्रिपूर), रविशंकर एस. शनमुगम (32) व रामसिंग मंगलसिंग सोढा (35, रा. बिकानेर, राजस्थान) यांचा समावेश आहे. 

गांधीबागच्या देवघर मोहल्ल्यात भूपेंद्र यांचे आर. सी. फेब्रिक्‍स नावाचे दुकान आहे. रामसिंग गांजाखेत चौकात माजिशा एसंजीचा संचालक व दलाल आहे. रामसिंग सप्टेंबर 2017 मध्ये भूपेंद्रच्या दुकानात आला होता. त्याने कपड्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी ओळख आहे. ते व्यापारी चांगली किंमत देऊन तुमचा माल खरेदी करतील अशी बतावणी केली. भूपेंद्र यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून व्यापाऱ्यांशी भेट घालून देण्यास सांगितले. 

रामसिंह काही दिवसांनंतर सुंदरम व रविशंकर यांना घेऊन भूपेंद्रच्या दुकानात आला. सुंदरमने जय ईश्‍वर साडी आणि रविशंकरने नक्षत्र टेक्‍सटाइलचे व्हिजिटिंग कार्ड त्यांना दिले. मोठ्या प्रमाणात माल खरेदी-विक्री करण्याचे सांगितले. रामसिंगच्या मध्यस्थीने भूपेंद्र यांनी सप्टेंबर 2017 ते जानेवारी 2018 पर्यंत सुंदरमला 22.27 लाखांचा माल पाठविला. रविशंकरला 9.47 लाखांचा माल पाठविला. आरोपींनी माल घेतला; मात्र त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. भूपेंद्रने स्वत: त्रिपूर येथे जाऊन आरोपींची भेट घेतली. त्यांनी रामसिंगला पैसे दिल्याचे सांगितले. पुन्हा पैसे मागितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. 

भूपेंद्र परत आले आणि पैशांसाठी सतत आरोपींना फोन करीत होते. मात्र, आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. रामसिंग व इतर दोन आरोपींनी व्यापाऱ्याला चुना लावला. आरोपींनी शहरातील आणखी 10 व्यापाऱ्यांना असेच फसविल्याची माहिती आहे. व्यापाऱ्याने तहसील पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com