‘झरी’च्या कपाळावर कुणी गोंदविला ‘झिरो’?

‘झरी’च्या कपाळावर कुणी गोंदविला ‘झिरो’?

झरी जामणी (जि. यवतमाळ) : ज्येष्ठ नेते वामनराव कासावर यांनी प्रयत्न केले नि १५ ऑगस्ट १९९२ रोजी झरी जामणीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळाला. लोक खूश झाले. आनंद वाटला. अपेक्षांच्या कक्षा रुंदावल्या. ‘‘आता आलबेल होईल. भूमी सुजलाम् सुफलाम् होईल. भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळणारे उद्योग सुरू होतील. जगण्याचे प्रश्न हळूहळू सुटायला लागतील.’’ ओझे व्हावे एवढ्या अपेक्षा लोकांच्या मनात दाटून आल्या. परंतु, ‘पहिले पाढे पंच्चावन्न’, अशीच गत झाली. केवळ नावाला तालुका झाला. त्याचा प्रत्यक्षात उपयोग काहीही झाला नाही. (The-fate-of-Zari-Jamani-taluka-in-Yavatmal-district-is-very-bad)

वनसंपदा, तलाव आणि विपुल प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीचा उपयोग करता आला नाही. आठ तलाव आहेत. परंतु, त्यातून पाणी देण्याची यंत्रणा उभारली नाही. म्हणून आजही शेती कोरडवाहूच आहे. गौणखनिजावर आधारित तीन उद्योगांपैकी सुरू असलेल्या दोन्हीमध्ये किती स्थानिकांना काम मिळाले, याची मोजदाद नाही. सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. झरी जामणी तालुक्यात पोस्टिंग म्हणजे ‘पनिशमेंट’ अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आहे. लोक म्हणतात, ‘‘साहेब, आधी कोणत्याच अपेक्षा नव्हत्या आमच्या. परंतु, तालुक्याचा दर्जा देऊन अपेक्षा आभाळभर केल्या. परंतु, कामे चिमूटभरही झाली नाहीत. जणू आमचीही वंचित बहुजन आघाडी करून टाकली! कशाची पनिशमेंट केली आम्हाला? का समृद्ध झरी तालुक्याच्या कपाळावर झिरो गोंदवून ठेवला?’’

‘झरी’च्या कपाळावर कुणी गोंदविला ‘झिरो’?
याला योगायोगच म्हणाल ना? वडिलांसह दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी

झरी जामणी तालुक्यातील बहुसंख्य जनता आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे. त्यांच्या प्रशासकीय व इतर सोयींच्या दृष्टिकोनातून तालुक्याची निर्मिती करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला हा तालुका सर्वात लहान असून, भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ व जंगलव्याप्त आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६८,२३६ हेक्टर आहे. तालुक्याच्या पश्चिमेला केळापूर तालुका तर उत्तरेला राळेगाव व केळापूर तालुक्याचा काही भाग आहे. पूर्वेस मारेगाव, वणी तालुका तर दक्षिणेला तेलंगणा राज्य आहे. तालुक्यात अनुसूचित जातीची संख्या सर्वाधिक आहे. तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र ग्रामीण भागात मोडते. एकही शहर नसल्याने नगर परिषद नाही. मुकुटबन, पाटण, आडेगाव आणि शिबला ही मोठी गावे आहेत.

दशरथ पाटील किनाके यांचे दातृत्व

तालुक्याची स्थापना झाली खरी; परंतु येथे तहसील कार्यालय कुठे स्थापन करायचे, हा प्रश्न होता. जागेचा प्रश्न असल्याने तालुका निर्मितीनंतरही शासकीय कार्यालयांसाठी स्थानिकांना हेलपाट्या माराव्या लागत होत्या. त्यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व पुढारी दशरथ पाटील किनाके यांनी स्वतःच्या मालकीची दहा एकर जमीन तहसील व इतर कार्यालयांसाठी दान दिली. तेव्हापासून ते दानशूर दशरथ पाटील नावाने ओळखले जातात. याच दहा एकराच्या परिसरात शासनाच्या विविध कार्यालयांचे बांधकाम करण्यात आले.

‘झरी’च्या कपाळावर कुणी गोंदविला ‘झिरो’?
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

म्हणायला नऊ तलाव; पण सिंचनाची बोंब

झरी जामणी तालुक्यात एकही मोठा प्रकल्प नसल्याने तालुका सिंचनापासून कोसो दूर आहे. तालुक्यात नऊ लघू प्रकल्प आहेत. पाचपोहर, चिलई, भिमनळा (मुळगवाण), उमरी, खडकडोह, पवनार, मुकुटबन, कोडपाखिडी आणि महादापूर येथे तलाव आहेत. परंतु शेती सिंचनासाठी त्यांचा काडीचाही उपयोग नाही. तालुक्यात ४२,११४ हेक्टर जमीन शेतीयोग्य आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी ही प्रमुख पिके घेतली जातात. सिंचनाखाली फक्त २,५५४ हेक्टर जमीन आहे. तालुक्यात नर्सरी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. याशिवाय एक ग्रामीण रुग्णालय, तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २० उपकेंद्रे आहेत.

तालुक्यात कोळसा, डोलोमाईट, सिमेंट दगड आदी गौणखनिज मोठ्या प्रमाणात आहे. मुकुटबन परिसरात तीन कोळसा खाणी व एक सिमेंट कंपनी असताना तालुक्यातील युवक बेरोजगार आहेत. स्थानिकांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा केला जातो. रोजगार मिळेल या आशेपोटी ज्या शेतकऱ्यांनी स्वतःची शेती दिली त्यांनाही रोजगार मिळाले नाही. त्यांच्याही तोंडाला पाने पुसली गेली. हरियाणा सरकारने स्थानिकांच्या रोजगारासाठी जो कायदा केला, त्याच प्रकारचा कायदा सरकाने स्थानिकांच्या भल्यासाठी करावा. रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्यावे.
- डॉ. श्याम बोदकुरवार, सामाजिक कार्यकर्ते, झरी जामणी तालुका
‘झरी’च्या कपाळावर कुणी गोंदविला ‘झिरो’?
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर
झरी जामणी तालुक्यात गौण वनउपजांची निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. हेच स्थानिकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. यात मूल्यवृद्धी करून स्थानिकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल. वनसंपदेतून स्थानिकांची आर्थिक बाजू भक्कम करता येईल व वन्यजीव व वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी शासनाने सूक्ष्म आराखडे तयार करावे. या भागाकडे लक्ष केंद्रित करून टूरिझमच्या दृष्टीने विचार करावा. त्यामुळे रोजगार निर्माण होतील.
- डॉ. रमझान विराणी, विभाग प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग एस. एम. महाविद्यालय, पांढरकवडा, मानद वन्यजीवसंरक्षक, यवतमाळ

(The-fate-of-Zari-Jamani-taluka-in-Yavatmal-district-is-very-bad)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com