मेळघाटातील महिला बनवताहेत ब्रॅण्डेड बॅग्ज; ‘धात्रोम’ देतोय नवी ओळख

 बॅग व अन्य वस्तू तयार करताना आदिवासी महिला
बॅग व अन्य वस्तू तयार करताना आदिवासी महिला

मांजरखेड (जि. अमरावती) : चौराकुंड हे मेळघाटातील दुर्गम गावं... जगाच्या नकाशावर हे गाव नवी ओळख निर्माण करीत आहे. ते महिलांच्या कलाकुसरीमुळे. येथील आदिवासी महिला (Tribal women) नियमित काम सांभाळून नवनवीन बॅग्ज, कुर्ती (Bags, kurtis) तयार करीत आहेत. त्यांच्यातील कल्पकतेमुळे जगातील व्यापारपेठेत त्यांची नवीन ओळख निर्माण होत आहे. वारली, फॉरेस्ट, फॉरेस्ट सोल ब्रॅण्डने तर पुणे व मुंबईकरांसोबतच बंगळूरवासीयांना अक्षरशः मोहनी घातली आहे. (The women of Melghat make branded bags and dresses)

मेळघाटमधील आदिवासी महिलांमध्ये विविध कौशल्य दडलेले आहे. याच कौशल्याचा वापर करून येथील महिलांना सक्षम बनविण्यासाठी चौराकुंड येथे ‘धात्रोम-चौराकुंड’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. श्‍यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत येथील महिलांसाठी दोन शिलाई मशीन पुरविण्यात आल्या. यासाठी गावातील कार्यतत्पर महिलांना प्रशिक्षित करण्यात आले.

सात महिला चांगल्या प्रशिक्षित झाल्या असून ते जवळच्या व्यावसायिक केंद्राकडून कच्चा माल खरेदी करून विविध बॅग्ज, कुर्ती तयार करतात. तयार झालेल्या वारली, फॉरेस्टचे कलाकुसरी असलेल्या बॅग्जचे काही छायाचित्रे जेव्हा समाजमाध्यमांवर टाकण्यात आली तेव्हा विदर्भासह पुणे, मुंबई, बंगळूर, डेहराडून व चेन्नई सारख्या शहरातून मोठी मागणी नोंदविण्यात आली.

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याचा फटका या व्यवसायालासुद्धा बसला असून, कच्च्या मालाअभावी तूर्तास उत्पादन थांबले आहे. मात्र, या काळातही या महिलांनी न थांबता मास्कची निर्मिती करून विक्री केली आहे. महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाला मिळालेल्या मागणीमुळे आत्मविश्वास वृद्धिगंत झाला आहे. कोरोनोत्तर काळात हा धात्रोम प्रकल्प केवळ चौराकुंड पुरता मर्यादित न राहता दहा ते बारा खेड्यांचे सामूहिक उत्पादन केंद्र होणार आहे.

भविष्यातील महाब्रॅंड

कोरकू भाषेत धात्रोम म्हणजे विळा. जंगलाच्या व घरच्या प्रत्येक कामाच्या वेळी हा विळा महिलांसोबत असतो. यामधून या प्रकल्पाला धात्रोम हे नाव देण्यात आले. मास्क, बॅग्ज, कुर्ती सोबत चहाचे मग या वस्तूंनासुद्धा मागणी अधिक आहे. सध्याची मागणी बघता निश्‍चित धात्रोम भविष्यातील मोठा ब्रॅण्ड म्हणून विकसित होईल, असा आशावाद या प्रकल्पाचे समन्वयक अविनाश हातवटे यांनी व्यक्त केला.

मार्केटिंगवर भर

छोट्याशा योगदानातून जर आदिवासी समाजातील बहुसंख्य महिलांना रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्ही निश्‍चित त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी चांगले ठिकाण उपलब्ध करून देऊ. पर्यटक येत असलेल्या प्रत्येक ठिकाणी मेळघाटातील प्रसिद्ध वस्तू उपलब्ध होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिताली शेठी यांनी सांगितले.

(The women of Melghat make branded bags and dresses)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com