धारणी ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत झालेली ही सर्वांत मोठी घरफोडी असल्याची माहिती पुढे आली. येथील आसिफ सौदागर यांच्या लहान भावाच्या मुलीचा साखरपुडा अचलपूर येथे रविवारी (ता. 17) होता. त्यामुळे घर बंद करून ते कुटुंबासह धारणीवरून अचलपूर येथे गेले होते.
धारणी (जि. अमरावती) ः शहरातील वॉर्ड क्रमांक बारामधील नगरसेवकाच्या निवासस्थानी धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह लाखोंची रोख रक्कम, असा अंदाजे 35 ते 40 लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी (ता. 18) सकाळी ही घटना उघडकीस आली.
नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार
धारणी ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत झालेली ही सर्वांत मोठी घरफोडी असल्याची माहिती पुढे आली. येथील आसिफ सौदागर यांच्या लहान भावाच्या मुलीचा साखरपुडा अचलपूर येथे रविवारी (ता. 17) होता. त्यामुळे घर बंद करून ते कुटुंबासह धारणीवरून अचलपूर येथे गेले होते.
सोमवारी (ता. 18) ते कुटुंबासह धारणीला पोहोचले असता, घरफोडी झाल्याचे निदर्शनात आले. चोरट्यांनी घरातील आलमारी, कपाटातील सामग्री अस्ताव्यस्त करून चांगलाच धुमाकूळ घातला होता. धाडसी घरफोडीच्या घटनेनंतर धारणीचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. ठाकूर, अनिल झारेकर, अनुराग पाल, अरविंद सरोदे यांसह मोठा ताफा घटनास्थळी जमला होता. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना घरफोडीच्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. गुन्हेशाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
धारणीच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घरफोडी असल्याने पोलिसांनी या मार्गावरील जेथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्याचे फुटेज तपासणीचे काम सुरू केले. त्यातून काही महत्त्वाचा सुगावा मिळण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
संपादन - अथर्व महांकाळ