बुद्धगिरी टेकडीवरील मूर्तीची चोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

भन्ते यांची गादीही जाळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल; पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
मूल (जि. चंद्रपूर) ः येथील चंद्रपूर मार्गावरील बुद्धगिरी टेकडीवरून बुद्धाच्या मूर्तीची चोरी आणि भन्ते यांच्या झोपडीतील गादी जाळल्याची घटना बुधवारी (ता. 21) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मूल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर बौद्ध समाजबांधवांनी आणि अनुयायांनी येथे मोठी गर्दी केली होती. काही बौद्ध भिक्‍खू मंगळवारी सकाळी वंदना करीत होते. त्यानंतर ते चंद्रपूरकरिता रवाना झाले. स्थानिक भन्ते रात्री साडेदहाच्या सुमारास बुद्ध मूर्तीकडे वंदना करण्याकरिता गेले असता, तिथे त्यांना बुद्ध मूर्ती दिसून आली नाही. टेकडीवर वास्तव्यास असलेले भन्ते यांच्या झोपडीतील गादीसुद्धा अज्ञात व्यक्तीने जाळली.
या घटनेची माहिती सकाळी समाज बांधवांना मिळताच, त्यांनी टेकडीवर गर्दी केली. घटनेची चौकशी करून आरोपीस अटक करण्याची मागणी केली. मूल येथील वरिष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षक कासार आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे कोकाटे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. श्वानपथकाद्वारा परिसरातील भागाची पाहणी करण्यात आली. दरम्यान, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of statue on Buddhagiri hill