esakal | यवतमाळातील मांडवी शिवारात ‘बिजली’, ‘रंगीला’, ‘नुरा’चा मुक्तसंचार
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळातील मांडवी शिवारात ‘बिजली’, ‘रंगीला’, ‘नुरा’चा मुक्तसंचार

यवतमाळातील मांडवी शिवारात ‘बिजली’, ‘रंगीला’, ‘नुरा’चा मुक्तसंचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरी जामणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील जामणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मानवी शिवारात अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार (movement of tigers) आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यावर उपाय म्हणून काही दिवसांतच तारांचे कुंपण करण्यात येणार आहे. जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजनांवर भर (Emphasis on measures from the forest department) देण्यात येत आहे. (There-are-four-tigers-with-Rangila-In-the-Mandvi-Shivara-of-Yavatmal)

मांडवी परिसरात पाच वाघांचे अस्तित्व आहे. चार दिवसांपूर्वी दिसलेला वाघ ‘रंगीला’ नावाने ओळखला जातो. मुख्य वाघीण ‘बिजली’ हिने मागील चार वर्षांत दहा पिलांना जन्म दिला आहे. त्यापैकी सहा वाघांनी मांडवी शिवारातून स्थलांतर केले आहे. ‘बिजली’, ‘रंगीला’, ‘नुरा’ आणखी दोन अशा पाच वाघांचे अस्तित्व मांडवी शिवारात आहे. ‘रंगीला’ हा थोडा निडर आहे. त्यामुळे त्याचे नाव ‘रंगीला’ ठेवल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. वाघांचा मुक्तसंचार असल्यामुळे मांडवी शिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत. तालुक्यात चार-चार बछड्यांना घेऊन दिमाखात चालणारी वाघीण, उन्हाळ्यात पाणवठ्यांवर बिनधास्तपण पाणी पिण्यासाठी येणारे वाघ यांचा नागरिकांना परिचय झाला आहे. वाघांची शिकार, माणसांवर होणारे हल्ले अशा घटना वाढू लागल्या आहेत.

काही दिवसांपासून मानव व वन्यजीव संघर्षही पाहायला मिळत आहे. वाघांवर पाळत ठेवण्यासाठी वनमजुरांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या या परिसरात २० वनमजूर काम करीत आहेत. जंगलाला लागून असलेल्या शेताजवळील जंगल परिसरात तारांचे कुंपण करण्याचे ठरविण्यात आले आहे.

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत मांडवी, गवारा व पिवरडोल या गावांसाठी तार कंपाउंडसाठी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. डीपीटीसीच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार आहे. तारांचे कुंपण झाल्यानंतर वाघांच्या मुक्तसंचारावर बंधने येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: धारदार शस्त्राने वृद्धेचा गळा कापून खून; पती गेले होते मुलीकडे

परिसरामध्ये वाघ दिसताच इतर नागरिकांना संपर्क करून गर्दी केल्यास वाघ बिथरून नागरिकांना जायबंदी किंवा हल्ला करू शकतो. त्यामुळे शक्यतोवर नागरिकांनी त्वरित वनविभागाला संपर्क करावा, जेणेकरून त्या परिसराचा ताबा वनविभागाला घेता येईल.
- एस. बी. मेहरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जामणी

(There-are-four-tigers-with-Rangila-In-the-Mandvi-Shivara-of-Yavatmal)

loading image