नायब तहसीलदार, पीएसआयची विभागीय चौकशी होणार

file photo
file photo

नागपूर : उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेले नायब तहसीलदार व पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
चोरीच्या घटनेच्या तब्बल 12 दिवसांनंतर उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआर शासकीय कर्मचाऱ्याऐवजी खासगी चौकीदाराकडून करण्यात आली. त्यामुळे "गोलमाल' असल्याची शंका निर्णाण झाली. कॉंग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने चौकशीसाठी दोन सदस्यीय पथक पाठविले. पथक येण्याच्या एक दिवस आधीच दोन डीव्हीआर चोरट्यांनी परत केले. विशेष म्हणजे एफआयआरमध्ये एकाच डीव्हीआरचा नोंद केली होती. चौकशीत पोलिस व महसूल यंत्रणेने हलगर्जीपणा केल्याचे पथकाच्या लक्षात आले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी सर्व अहवाल मागविला. नायब तहसीलदार व पीएसआय यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. दोन्ही अधिकाऱ्यांची विभागाची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com