
अमरावती : प्रेमविवाह करण्यासाठी आलेल्या युवतीला पकडून तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली. त्यानंतर निबंधक कार्यालयातून तिला ऑटोरिक्षात जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. ही घटना येथील जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या उपनिबंधक कार्यालयासमोर बुधवारी (ता. पाच) दुपारी घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. प्रकरण अंगलट येईल या भीतीने प्रेयसीचा प्रियकर घटनास्थळावरून पसार झाला.
एक युवती आपल्या प्रियकरासोबत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी बुधवारी अमरावती येथील उपनिबंधक कार्यालयात आली होती. हा आंतरजातीय विवाह असल्याने युवतीच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. प्रेमविवाहाची नोंदणी करण्यासाठी हे जोडपे येथील उपनिबंधक कार्यालयात आल्याची माहिती मुलीच्या नातेवाइकांना मिळाली. विवाह नोंदणीसाठी अवधी असल्याने हे प्रेमीयुगुल कार्यालयाबाहेर उभे होते. याचवेळी एका ऑटोरिक्षातून युवतीचे आई-वडील व भाऊ तेथे पोहोचले. त्यांनी युवतीला बेदम मारहाण करणे सुरू केले.
अवश्य वाचा- आधी खाल्ला मार, आता थाटला संसार
भावी पत्नीला अचानक आलेल्या या संकटातून सोडविण्याऐवजी प्रियकर तेथून पसार झाला. युवतीला मारहाण करीत ऑटोरिक्षात बसवून नातेवाईक घेऊन जायला लागले. युवतीने सोबत येण्यास प्रचंड विरोध केला. मात्र, आई-वडिलांपुढे तिची ताकद कमी पडली. तिने हमालीच्या कामासाठी वापरण्यात येणारा लोखंडी आकोडा त्यांना मारून जखमी करण्याचा प्रयत्न केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने बघ्यांची गर्दी उसळली होती. घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.