
मारेगाव येथील फसवणुकीच्या कारनाम्यात अग्रेसर असलेला व्यक्ती व त्याच्या साथीदाराने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील कर्जबाजारी व्यक्तीला एक लाख रुपयांचे तीन लाख रुपये देतो, असे आमिष फोनद्वारे दिले.
मारेगाव (जि. यवतमाळ) : एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केला. मात्र, दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल देण्याचा बेत संशय आल्याने फसला. टोळके एक लाख रुपये घेऊन पसार झाले. पोलिसांत तक्रार दिल्यावर पाच संशयितांना अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (ता.11) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
अवश्य वाचा- `माझ्याशी लग्न कर अन् बायकोला हाकलून दे` प्रेयसीने तगादा लावल्याने प्रियकराने दिले विहिरीत ढकलून....
मारेगाव येथील फसवणुकीच्या कारनाम्यात अग्रेसर असलेला व्यक्ती व त्याच्या साथीदाराने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील कर्जबाजारी व्यक्तीला एक लाख रुपयांचे तीन लाख रुपये देतो, असे आमिष फोनद्वारे दिले. ठरल्याप्रमाणे भद्रावती येथे एकास पाठवून मारेगाव शहर महामार्गावरील घटनास्थळावर महेंद्र तिवारी याच्यासोबत मामेभाऊ असे दोघे आले. टोळक्यांनी एक लाख रुपये मागितले असता, यावर आधी तीन लाख रुपये द्या, असे म्हटल्यावर दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल दाखविले. ते बनावट असल्याचे लक्षात आल्याने टोळक्यांची लढवलेली शक्कल फसली. एक लाख रुपये आमच्याकडे दे नाहीतर जीवानिशी मारून टाकेल, अशी धमकी देत एक लाख रुपये घेऊन टोळक्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
अवश्य वाचा- घरातच उघडला होता त्याने बनावट विदेशी दारूचा कारखाना, अन् एक दिवस...
या प्रकरणी महेंद्र ईश्वरलाल तिवारी, महेंद्र ईश्वरलाल तिवारी (रा. भद्रावती) याने मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तपास करून पोलिसांनी संशयित राजू भुजाडे, अरविंद चौघुले, अविनाश जांभूळकर, मारोती पवार, लीलाधर मुरस्कार यांना अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलिस उपनिरीक्षक अमोल चौधरी, सुरेंद्र टोंगे, अजय वाभीटकर, नितीन खांदवे, किशोर आडे, प्रिया निब्रड, विना गेडाम यांनी केली.
संपादन ः राजेंद्र मारोटकर