मुलगी पळविल्याचे सांगून चक्क पैसेच पळविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

लातूर : अहो, एका रिक्षाचालकाने लग्नाचे अमिष दाखवून आमची मुलगी पळवून नेली अाहे. आम्ही तिला शोधत आहोत. अजून सापडली नाही. हा त्या दोघांचा फोटो. तुम्हाला कोठे दिसलेत का हे? अशी विचारणा करत अाणि आपल्या ‘विरह नाट्यात’ गुंतवून ठेवत काही चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडील पैसे पळवून नेले. हे ज्येष्ठ नागरिक निवृत्त पोलिस निरिक्षक आहेत. त्यांनाच असा अनुभव आल्याने पोलिस ‘त्या’ चोरट्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.

ही घटना कापड लाईन परिसरात सोमवारी (ता. १८) भरदुपारी घडली. या प्रकरणी अयुब मेहताबसाब शेख (वय ६२. रा. अयोध्या नगर) यांनी लगेचच गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर शहरात चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळीचे आणखी एक नवे उदाहरण समोर आले अाहे.

शेख यांनी नुकताच एक प्लॉट घेतला आहे. त्याचे पैसे देण्यासाठी आैसा रस्त्यावरील आयसीअायसीआय बँकेतून त्यांनी एक लाख दहा हजार रूपये काढले. बॅंकेतून बाहेर येताना त्यांनी ते पैसे जवळील कापडी बॅगेत ठेवले. ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तेथून त्यांनी मिनी मार्केट जवळील एचडीएफसी बँकेत दहा हजार रूपये जमा केले. उरलेले एक लाख आणि स्वत:कडील पूर्वीचे पाच हजार रुपये अशी रक्कम, बॅगेत होती. बँकेतून ते कापड लाईन परिसरात गेले. तेथे त्यांना हे चोरटे भेटले. 'आमची मुलगी पळवली आहे', असा बनाव करून दोघांनी शेख त्यांना बोलण्यात गुंतवले. तर तिसऱ्याने डिक्कीतील पैशांची बॅग पसार केली. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांत शेख यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. मात्र, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यात दोन चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

Web Title: thief acts like their daughter is lost and stole money