प्रेयसीच्या खर्चासाठी तो बनला चोर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करता याव्यात यासाठी कपिल अशोक गवरे (२५, रा. गौतमनगर, गिट्टीखदान) हा युवक चक्‍क चोर बनला. प्रेमापोटी त्याने १६ ठिकाणी घरफोडी केली. या कुख्यात चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली. तसेच त्याने दिलेल्या माहितीवरून मो. शाफिक मो. रफिक (२२, रा. मोमीनपुरा) व शेख सोहेल शेख सलीम (२२, रा. बोरगाव, गिट्टीखदान) या साथीदारांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी पत्रपरिषदेत दिली.

काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्यातच कपिलची माहिती पोलिसांना समजली. पोलिस मागावर असल्याने कपिल जागा बदलवित असे. १५ ऑगस्टला कपिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने शहरात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यावरून त्याने दिलेल्या माहितीवरून मो. शाफिक मो. रफिक (२२, रा. मोमीनपुरा) व शेख सोहेल शेख सलीम (२२, रा. बोरगाव, गिट्टीखदान) या साथीदारांना अटक केली. ज्या ठिकाणी सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते ती जागासुद्धा कपिलने दाखविली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ७५ ग्रॅम सोने, १२५ ग्रॅम चांदी, सॅमसंग कंपनीचा ४० इंची टीव्ही, दोन मोबाईल, साड्या असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

दिवसभर फिरून शोधायचा बंद घर, फ्लॅट
कपिल हा एकटाच चोऱ्या करीत असे. दिवसभर शहरात फिरून बंद घर व फ्लॅट यांची पाहणी करायचा. संधी मिळताच काही मिनिटांत चोरी करून पसार व्हायचा. चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी तो स्वत: जात नसे. शाफिक आणि सोहेल यांच्या मदतीने तो चोरीच्या मालाची विल्हेवाट लावत होता.

सध्या जामिनावर बाहेर
जानेवारी २०१८ मध्ये तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला. एकामागोमाग त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. त्याने कळमना, मानकापूर, गिट्टीखदान, जरीपटका, सक्करदरा व हुडकेश्‍वर हद्दीत एकूण १६ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

Web Title: Thief for the cost of a lover Crime