चोरट्याने घातली पोलिसाची वर्दी; एपीआयच्या घराती प्रवेश करीत चोरली पिस्तूल, तपासावरच प्रश्‍नचिन्ह

A thief stole a police pistol in Yavatmal
A thief stole a police pistol in Yavatmal

यवतमाळ : सहायक पोलिस निरीक्षकाच्या सर्व्हिस पिस्टलवर चोरट्याने हात साफ करून एक महिन्याचा कालावधी झाला आहे. सर्व बाजूने तांत्रिक तपास करूनही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे आता तपासावरच नागरिकांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्थ असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेत एपीआय राहुलकुमार राऊत कार्यरत आहेत. गेल्या २१ ऑक्‍टोबरला कामानिमित्त राऊत घराबाहेर पडले असताना दुपारी एक ते दीडच्यादरम्यान पोलिसांसारखी वर्दी परिधान केलेला ५० वर्षे वयोगटातील एक व्यक्ती घरात आला. त्यावेळी मोलकरीण एकटीच घरी होती. संधी साधून बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरचे कुलूप तोडून एपीआय राऊत यांची सर्व्हिस पिस्टल मॅग्जिन हॉलिस्टरसह लंपास केली.

दिवसाढवळ्या चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या घरात शिरून चोरट्याने पिस्टलवरच हात साफ केल्याने एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

राहुलकुमार राऊत यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार रेखाचित्र काढून सर्वच पोलिस ठाण्यांत पाठविण्यात आले. तपास सुरू असतानाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे काहीसा तपास थंडबस्त्यात पडला होता.

पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तपास सुरू आहे असेच उत्तर दिले जाते. सामान्य नागरिकांच्या घरी चोरीच्या घटना नित्याचाच झाल्या आहेत. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या घरी चोरी होते. तेव्हा नागरिकांचेही त्याकडे विशेष लक्ष असते. राऊत यांचे पिस्टल चोरी होऊन महिनाभराचा कालावधी झाला आहे. मात्र, चोरटाच गवसत नसल्याने चोरीचे रहस्य कायमच आहे.

अधिकारी म्हणतात, समांतर तपास

यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून डीबी व एलसीबीच्या पथक चोरट्याच्या मागावर आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार रेखाचित्र जारी करण्यात आले. पोलिस अधिकारी समांतर तपास सुरू असल्याचे सांगत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com