नागरिकांनो सावधान! आपल्या दुचाकीकडे ठेवा लक्ष.. दुचाकी चोरट्यांनी घातला धुमाकूळ 

संतोष ताकपिरे 
Thursday, 17 September 2020

फ्रेजरपुरा, गाडगेनगर व शहर कोतवाली हद्दीत या घटना घडल्या. महत्त्वाची बाब म्हणजे एक दुचाकी तर चक्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीस गेली. त्यामुळे दुचाकीचोरीत अनेक घटनांमध्ये नागरिकांचा हलगर्जीपणासुद्धा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

अमरावती : शहरात दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. काल पुन्हा शहरातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल झाले. आठवड्यात शहरात दुचाकी चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे या घटनांवरून दिसून येते.

फ्रेजरपुरा, गाडगेनगर व शहर कोतवाली हद्दीत या घटना घडल्या. महत्त्वाची बाब म्हणजे एक दुचाकी तर चक्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीस गेली. त्यामुळे दुचाकीचोरीत अनेक घटनांमध्ये नागरिकांचा हलगर्जीपणासुद्धा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. चपराशीपुरा येथील शुक्रवाराबाजार परिसरातील प्रीतम ठाकूर यांच्या घरासमोर पार्किंग केलेली एमएच 27 बीसी 7317 क्रमांकाची पांडुरंग लक्ष्मण कपाटे याची दुचाकी चोरीस गेली. 

काय आहे पितृ पंधरवड्याचे महत्त्व? श्राद्धपक्ष म्हणजे नेमके काय? घ्या जाणून

तपोवनच्या संकेत कॉलनी येथील रचना गॅलॅक्‍सी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एमएच 27 बीएच 1247 क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली. त्याचप्रमाणे राजकमल चौकात सीतारामदासबाबा मार्केट समोर उभी ठेवलेली राजेश श्‍यामराव सहारे यांची एमएच 31 व्हीएस 8395 क्रमांकाची दुचाकीही कुणीतरी चोरली.

सोमवारी (ता. 14) एकाच दिवशी पाच दुचाकी चोरीस गेल्या. रविवारी (ता.13) एकाच दिवशी शहरात दुचाकी चोरीचे आठ गुन्हे दाखल झाले होते. दुचाकी चोरट्यांनी या आठवड्यात चांगलाच धुमाकूळ घालून पोलिसांच्या नाकीनऊ आणल्याचे दिसून येत आहे.

गावात प्रकाश पेरणाऱ्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांचे भविष्य अंधारातच, काय आहे वस्तुस्थिती.

बेसावधपणाही कारणीभूत

अपार्टमेंटमध्ये लाखो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट विकत घेतल्या जातो. परंतु वाहन पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी रखवालदार दिसत नाही, सीसीटीव्ही लावले दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अपार्टमेंटमधील पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे तसेच रखवालदाराची व्यवस्था करावी, असे बोलले जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves are stealing two wheeler in amaravati