esakal | चोरट्यांचा सोयाबिनवर डल्ला; शेतकऱ्यात भीतीचे वातावरण | Soybean Theft
sakal

बोलून बातमी शोधा

Soyabean

चोरट्यांचा सोयाबिनवर डल्ला; शेतकऱ्यात भीतीचे वातावरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) - शेतात कापूण व मळणी करून ठेवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील चार्ली शेत शिवारात घडली असुन चोरट्यांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भितिचे वातावरणात पसरले आहे. शेतकऱ्यांनी र्निसर्गाच्या अस्मानी संकटात जिवाचे रान करून सोयाबीनचे पीक वाचविले आणि आता त्याची कापणी व मळणी करून शेतात ठेवलेले सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याने हातात आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी नवीन संकटात सापडला आहे.

चार्ली येथील शेतकरी मनोज मुसळे यांनी काल (दिनांक 11) आपल्या शेतातील सोयाबीन ची मळणी करून रात्र उशीर झाल्यामुळे शेतातच ठेवले. सकाळी शेतात असलेले सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी गेल्यानंतर पाहिले असता सोयाबीनच्या ढिगातून दोन ते तीन पोती सोयाबीन चोरून नेल्याचे उघडकीस आले. शेतातील काढलेले सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परीसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: धम्मदीक्षेच्या पर्वावर खंड प्रकाशनापासून दूर; ४४ वर्षांत केवळ २२ खंड

शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाला तोंड देत लहान मुलाप्रमाणे शेत पिकांना वाढवून त्याची जोपासना करीत असतो, कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तोंडाजवळ आलेला घास हिराविले जातो यालाही समोर जात शेतकरी पीक वाचविण्याच्या धडपडीत असताना दारवर्षीपेक्षा यावर्षी ओयाबिन पिकाला असलेला दर चांगला असल्याने चोरट्यांचे लक्ष सोयाबीन पिकांकडे लागले असून अस्या चोरट्यांवर आळा घालण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

loading image
go to top