बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

Thieves danced in wine shop as they saw cash in counter
Thieves danced in wine shop as they saw cash in counter

यवतमाळ :   चोरटे चोरी करताना आपल्याला कुणी ओळख नये, पकडू नये म्हणून पूर्णपणे खबरदारी घेतात. हातात जे मिळेल ते घेवून पोबारा करतात. वाइन शॉपीत शिरलेल्या चोरट्यानी मात्र, कोणतीही भीती न बाळगता जवळपास तीन तास ठिय्या मांडत घशाखाली महागडी बिअर रिचविली. इतकेच काय तर आनंद व्यक्त करीत चक्क डान्सही केला. चोरट्यांच्या या करामतीची सर्वत्र चर्चा होत आहे.
 
वॉईनशॉपची भींत लोखंडी रॉडने फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह तीन लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केला. ही घटना येथील दत्त  चौकातील जे. के. वाइनशॉपमध्ये रात्री साडेबारा ते एकच्यादरम्यान घडली. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, ही घटना समोर आली. विशेष म्हणजे दोन्ही चोरट्यांना काऊंटरमध्ये रोकड दिसताच त्यांच्या आनंदाला उधाण आले आणि चक्क डान्स केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

रात्रीच्या वेळेस वाईनशॉपच्या दुकानाची पाठीमागील भिंत लोखंडी रॉडने फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आत प्रवेश करताना एकाने तोंडावर रुमाल बांधून तर एक चोरटा खुलेआम दुकानात फिरत होता. त्यातील एका चोरट्याला काऊंटरमध्ये पैसे दिसले. मग काय त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. चक्क आनंदाने नाचू लागला. 

महागडी दारूही चोरट्यांनी घशाखाली रिचविली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. चोरट्यांनी दुकानातून जवळपास दीड लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप व देशी-विदेशी दारूच्या बॉटल असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. जयस्वाय यांच्या वाइनशॉपीत यापूर्वीदेखील चोरी झाली होती. चोरीची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार आनंद वागतकर यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. .

डॉगस्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनाही पाचारण करण्यात आले. डॉग स्कॉड काही अंतरापर्यंत जावून घुटमळले. चोरीप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात श्याम जयस्वाल यांनी तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
.
संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com