कुख्यात चोरट्यांची टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नागपूर -  कुख्यात दोन चोरटे दीपक ऊर्फ यश राजू बोरकर (18, रा. नायडू वस्ती, भीमटेकडी, गिट्टीखदान) व योगेश ऊर्फ लक्‍की शाहू (22, रा. महाल) यांना मानकापूर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून अन्य साथीदारांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. 

सचिन मेश्राम (40, रा. गणपतीनगर) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली. सचिन घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असता दीपक घरात घुसला. त्याने तीन मोबाईल व मंगळसूत्र चोरून नेले. पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी गुप्त माहितीच्या आधारे दीपकला अटक केली. त्याने चौकशीत चोरीची कबुली दिली. त्यानंतर मानकापुरात योगेश उर्फ लक्‍की शाहू (22, रा. महाल) याने कंपनीतून 22 हजार रुपये किमतीचे 17 वायरचे बंडल आणि दुचाकी चोरली होती. त्याला पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला. याच आरोपीने यापूर्वी मानकापुरातून हिरो होंडा दुचाकी चोरी केली होती. तसेच कंपनीत घुसून ड्रील मशीन, कटर, नळाच्या तोट्या चोरी केल्या होत्या. या चोरीत नितीन रेवडीया (रा. नरसाळा) हा सहकारी होता, अशी कबुली योगेशने दिली. चोरीचा माल आरोपींनी मानकापुरातील बेटा कबाडीवाल्याला विकल्याचेही सांगितले. 

यानंतर पोलिसांनी अनिकेश ऊर्फ शिबू बारमोटे व रामप्रसाद ऊर्फ रामू उदयलाल बारेकर (रा. खुर्सापार, खैरलांजी, जि. बालाघाट) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे लोखंडी तराफे जप्त केले. अन्य आरोपी पवन ऊर्फ अन्नू कतलाम (रा. गोरेवाडा) याला अटक केली. त्यांच्याकडून सेंट्रिंगचा माल जप्त केला. अशा प्रकारे पोलिसांनी एक घरफोडी आणि 6 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

Web Title: thieves gang arrested in nagpur