Sindkhed Raja Crime : पोलीस असल्याची बतावणी अन् वृद्ध दाम्पत्याची लूट; रक्षाबंधन आटोपून परतताना २.१० लाखांचा ऐवज लंपास

किनगांव राजा येथील महामार्गावरील घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
Crime

crime

ESakal

Updated on

सिंदखेड राजा - रक्षाबंधन आटोपून दुचाकीवरून गांवाकडे परतणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला पोलिस असल्याची बतावणी करून अज्ञात दोघांनी अडविले. बतावणी करणाऱ्यांनी पवार दाम्पत्याला पोलिसांचे ओळख दाखवुन परिसरात चोऱ्या होत असल्याचे सांगत दागिने काढून बांधून ठेवण्यास सांगितले आणि नजर चुकवून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ता.२९ ऑगस्ट सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील किनगांव राजा-सिंदखेड राजा महामार्गावर घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com