esakal | बाप रे! लग्नसमारंभात चोरट्यांनी चक्क लांबवला बोकड; तब्बल ३ लाखांवर मारला डल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

thieves stole rupees 3 lac things in Wardha

गोविंदनगर, राऊतवाडी, नालवाडी येथील वंदना चंद्रकांत उभाड यांच्या मुलीचा लग्नसोहळा द. इव्हेंट मंगल कार्यालय येथे रविवारी (ता. सात) होता. उभाड कुटुंबीय शनिवारीच मंगल कार्यालयात आले होते. त्यांची बहीण ज्योती शेटसुद्धा लग्नाला आली होती.

बाप रे! लग्नसमारंभात चोरट्यांनी चक्क लांबवला बोकड; तब्बल ३ लाखांवर मारला डल्ला 

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा: गत काही दिवसांपासून चोरट्यांनी जिल्हाभर चांगलाच धुमाकूळ घातला असून शहरातील इव्हेंट मंगल कार्यालयातून तब्बल तीन लाख पाच हजार तर देवळी बसस्थानकातून 45 हजार, असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.तर लसनपूर येथून दोन बोकड चोरट्यांनी चोरून नेले. या तीनही घटना रात्रीदरम्यान उघडकीस आल्या.

गोविंदनगर, राऊतवाडी, नालवाडी येथील वंदना चंद्रकांत उभाड यांच्या मुलीचा लग्नसोहळा द. इव्हेंट मंगल कार्यालय येथे रविवारी (ता. सात) होता. उभाड कुटुंबीय शनिवारीच मंगल कार्यालयात आले होते. त्यांची बहीण ज्योती शेटसुद्धा लग्नाला आली होती.

हेही वाचा - भारतरत्नांना कोणासमोरही देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका 

वंदना उभाड यांच्याकडे ग्रे कलरच्या लेदरबॅंगमध्ये सोन्याचे मंगळसूत्र 10 ग्रॅम किंमत 25 हजार, मंगळसूत्र 15 ग्रॅम 37 हजार 500, कानातील सोन्याचा बास्केटचा एक रिंग जोड चार ग्रॅम किमत 10 हजार, सोन्याचा टॉप्न्स एक जोड तीन ग्रॅम किमत साडेसात हजार, झुमका दहा हजार, सोन्याची अंगठी पाच हजार, सोन्याचा नेकलेस 25 हजार, सोन्याचा गोफ 15 ग्रॅम 37 हजार 500, सोन्याची लहान चेन पाच हजार, असे दोन लाखांचे दागिने आणि रोख एक लाख तसेच पाच हजारांचा मोबाईल, असा तीन लाख पाच हजारांचा मुद्देमाल होता. 

दुपारी एक वाजता लग्न लागले. स्टेज समोरील सोफ्यावर त्यांची नणंद गीता कुरडकार रा. येवती ही बसून होती. ज्योती शेटे हिची पर्स तिच्या जवळ सोफ्यावर बाजूला ठेवूनच होती. दोघी लग्न लावण्याकरिता गेल्या. परत आल्यानंतर तिथे पर्स नव्हती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने असलेली पर्स लांबविली. त्यांनी सर्वत्र शोधही घेतला, पण मिळून आली नाही. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

देवळी येथील मनीषा धांदे ही महिला माहूर-देवळी या बसमधून प्रवास करीत होती. सावंगी येथून दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधून 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किमत 45 हजार रुपयांचे लांबविले. या प्रकरणी देवळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

नक्की वाचा - चला, शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करूया; शेतकरी आंदोलनाचे नेते अमर हबीब यांचं आवाहन 

सहा हजार रुपयांचा बोकड लांबवला

समुद्रपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या लसनपूर शिवारातून दुचाकीने आलेल्या दोन चोरट्यांनी सहा हजार रुपये किमतीचा बोकड लांबविला. लसनपूर येथील रामभाऊ येलमुले यांचा नोकर गाय, म्हशी व बकऱ्या चारीत होता. गुरे पाणी पाजण्यास पाण्याचे टाकीवर येत असताना मोटारसायकल दोन व्यक्‍ती तोंडाला रुमाल बांधून आले. मागे बसून असलेल्या व्यक्‍तीने बोकड उचलून दुचाकीवर ठेवून पसार झाले. यात त्यांचे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image