Thieves Theft Revolver from home instead of money in Chandrapur District
Thieves Theft Revolver from home instead of money in Chandrapur District

अजब चोरी! घरात घुसलेल्या चोरांना महिलेनं पैसे देण्यास दिला नकार म्हणून घरातून पळवली परवानाधारक बंदूक

चंद्रपूर : विधवा महिलेच्या घरी चोरी करण्याचा बेत आखला. गडचांदुरातील युवकांनी या कामासाठी हरियाणातील तिघांना बोलावून घेतले. ठरल्यानुसार घर गाठले. पैशाची मागणी केली. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिला. शेवटी या चोरट्यांनी घरातील परवानाधारक बंदूक घेऊन वाहनाने पळ काढला. ही घटना राजुरा तालुक्‍यातील हरदोना बूज. येथे घडली.

गडचांदूरचे एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांनी तातडीने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीतून तिघे हरियानाच्या दिशेने पळाल्याचे समोर आले. जिल्ह्यातील सर्व पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना केल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने मध्यप्रदेशाच्या सीमेवरील देवलापार येथून तीन युवकांना ताब्यात घेतले. प्रदीप शोरान उर्फ अजित शोरान (वय 23), आनंद सतबीरसिंग (वय 23, दोघेही रा. तालू, ता. बवानी खेडा, जि. भवानी), जयप्रकाश वीजेंदर सिंग (वय 26, रा. माडीदोगी, धर्मशाळा, जि. रोहतक) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत..

राजुरा तालुक्‍यातील हरदोना बूज. येथे गंगा नारायण मेघवंशी राहतात. पतीच्या निधनानंतर त्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. गावातील पवन आणि अन्य एका युवकाने या महिलेच्या घरी चोरीचा बेत आखला. या कामासाठी या युवकांनी हरियानातील तिघांना बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी (ता. 6) रात्री 8.30 वाजताच्या सुमारास या युवकांनी गंगा मेघवंशी यांच्या घरी प्रवेश केला. महिलेकडे पैशाची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास महिलेने नकार दिल्यानंतर युवकांनी घरात शोधाशोध केली. परंतु, काहीच हाती लागले नाही. अखेर, घरातील 12 बोअरची परवानाधारक बंदूक, चारचाकी वाहनाची चावी आणि मोबाईल घेऊन पळ काढला.

या घटनेची तक्रार गडचांदूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरवित या गुन्ह्यात सहभागी असलेल्या स्थानिक रहिवासी असलेल्या पवन व अन्य एका युवकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत या युवकांनी हरियानातील तीन युवकांनी घटनेनंतर वाहनाने पळ काढल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देऊन नाकाबंदी करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत चोरटे जिल्ह्याबाहेर जाण्यात यशस्वी झाले. या घटनाक्रमानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना या चोरट्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सापडले. तातडीने सायबर सेलच्या माध्यमातून लोकेशन ट्रेस करण्यात आले. त्यानुसार चोरटे हे नागपूर-जबलपूर मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस निरीक्षक खाडे यांनी तातडीने एलसीबीचे पथक नागपूरच्या दिशेने पाठविले. ग्रामीण नागपूर पोलिसांची मदत घेऊन नागपूर ते जबलपूर मार्गावरील देवलापार येथून तीन युवकांना ताब्यात घेतले. या तीन युवकांकडून बंदूक, मोबाईल, एआर 26-बीजे 4860 क्रमांकाचे वाहन जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात नईम खान पठाण, मनोज रामटेके, सुभाष गोहोकार, गणेश भोयर, नरेश डाहुले, विनोद जाधव, अमोल धंदरे, रवींद्र पंधरे यांच्या पथकाने केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com