तिसऱ्या बंदीवानाचा मृत्यू

file photo
file photo

अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 21) एका न्यायाधीन बंदीवानाचा मृत्यू झाला. अब्दुल हसन अब्दुल बशीर (वय 35 रा. लालखडी) असे मृत बंदीवानाचे नाव आहे. यापूर्वी सलग दोन दिवसांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोन बंदीवानांचा मृत्यू झाला होता.
नागपुरीगेट ठाण्यात मारहाप्रकरणी बुधवारी (ता.19) गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक करून अब्दुल हसन विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयीन कोठडीअंतर्गत बुधवारी (ता. 19) मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली. गुरुवारी (ता. 20) रात्री अ. हसन याची प्रकृती बिघडल्यामुुळे कारागृहातील रुग्णालयात प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाच्या आय.सी.यु. युनिटमध्ये अब्दुल हसन यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी (ता. 21) सकाळी सदर व्यक्तीची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान त्याचा इर्विनमध्येच मृत्यू झाला, असे कारागृह प्रशासनाने सांगितले. पोलिसांनी स्थानिक पातळीवर पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली. यापूर्वी 19 व 20 जून रोजी उपचारादरम्यान जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोन बंदीवानांचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com