अमरावतीत उष्माघाताचा तिसरा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

अमरावती - तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका बेघरांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात एप्रिल महिन्यात १७ दिवसांत तिघांचे बळी गेले असून, सामान्य नागरिकांना वाढत्या उकाड्यामुळे फटका बसत आहे.

अमरावती - तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका बेघरांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरात एप्रिल महिन्यात १७ दिवसांत तिघांचे बळी गेले असून, सामान्य नागरिकांना वाढत्या उकाड्यामुळे फटका बसत आहे.

दोन दिवसांपूर्वी वलगाव ठाण्याच्या हद्दीत रेवसा गावात उन्हात काम करणाऱ्या लक्ष्मण गणपत सोळंके (वय ३२, रा. म्हैसपूर) यांची प्रकृती अचानक बिघडली.  त्यांना सोमवारी (ता. १६) उपचाराकरिता अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १७) श्री. सोळंके यांचा मृत्यू झाला. सोळंके यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. प्रकरणी वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू, अशी नोंद घेतली. त्यापूर्वी मंगळवारी (ता. तीन) रुक्‍मिणीनगर परिसरात एका खासगी रुग्णालयाच्या बाहेर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.

त्याची अद्याप ओळख पटली नाही. राजापेठ पोलिसांनी त्यासंदर्भात आकस्मिक मृत्यू, अशी नोंद घेतली. त्यानंतर मंगळवारी (ता. १०) जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ समोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचे कुणीही नातेवाईक आले नाही किंवा इर्विनमध्ये सदर व्यक्ती दाखल असल्याची कोणतीही नोंद नव्हती. या बेवारस व्यक्तीचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्‍यता रुग्णालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली. त्यापूर्वी मार्च महिन्यात राजापेठ ठाण्याच्या हद्दीत नंदा मार्केटजवळ एका व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळला होता.

Web Title: third victim of heat wave in Amravati