पतीला धमक्या अन् पत्नीने विषाची पुडी घेऊन गाठले एसटीचा आंदोलन मंडप

कामावर रुजू व्हावे यासाठी अधिकारी धमक्या देत असल्याने ते नैराश्यात गेले
yavatmal district
yavatmal districtyavatmal district

वणी (जि. यवतमाळ) : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी यवतमाळवरून वणी येथे वाहतूक नियंत्रक पदावर पदोन्नती झालेला कर्मचारी अनिल विठ्ठल कपिले हा मानसिकदृष्ट्या खचला आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी धमकी (Threat) देत असल्याचा आरोप करीत पत्नीने मुलासह विषाची पुडी घेऊन (Poison powder) वणी गाठले. कुटुंबातील कोणाच्याही जीवितास काही झाल्यास महामंडळाचे अधिकारी व शासन जबाबदार असेल असे पत्नीने सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांना (ST staff) राज्य सरकारच्या (state government) सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन (agitation) सुरू केले आहे. या आंदोलनाला जवळ जवळ दोन महिने पूर्ण होत आहे. योग्य तोडगा निघताना दिसत नाही. निलंबन आणि बडतर्फीचे सत्र सुरू आहेत.

अनिल विठ्ठल कपिले यांची पदोन्नती झाल्याने ते वाहतूक नियंत्रक म्हणून वणी आगार येथे रुजू झाले. त्यानंतर राज्य मार्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले. ते सुध्दा संपात सहभागी झाले होते. मात्र, कामावर रुजू व्हावे यासाठी अधिकारी धमक्या देत असल्याने ते नैराश्यात गेले.

yavatmal district
‘आईचा गर्भ अन् कबर’ हेच मुलींसाठी सुरक्षित; सुसाईड नोटमध्ये उल्लेख

कपिले यांचे वास्तव्य यवतमाळला आहे. ते सतत आत्महत्या करण्याची भाषा वापरत असल्याचे पत्नी अर्चना यांनी सांगितले. तसेच नोकरीच्या कारकिर्दीत अनेक हालअपेष्टा सहन केल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच आता अधिकारी देत असलेल्या धमक्यांमुळे (Threat) अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली आहे. पती मानसिकदृष्ट्या खचल्याने पत्नी अर्चना, मुलगा प्रथमेश व पती सह विषाची पुडी घेऊन वणी येथील संपकऱ्यांचे उपोषण मंडप गाठले. तिचा टाहो मन विचलित करणारा होता.

अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार

अर्चनाने धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. परिवारातील कोणाच्याही जीवितास काही झाल्यास महामंडळाचे अधिकारी व शासन जबाबदार असेल असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com