तुषार पुंडकर हत्याकांडाचा अखेर उलगडा

Three accused arrested in Tushar Pundkar murder case
Three accused arrested in Tushar Pundkar murder case

अकोला  : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. तुषार पुंडकर यांची हत्या राजकीय हेतूने प्रेरित नव्हे, तर जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुंडकर हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर पवन सेदाणी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना गुरुवारी (ता.26) अटक केली आहे.

अकोट शहर पोलीस स्टेशनलगतच्या पोलीस वसाहतीमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर अज्ञात आरोपींनी देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून त्यांची २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास निर्घृण हत्या केली होती. मारेकºयांनी नियोजनपूर्वक हत्या करण्याचा कट रचला होता, हे घटनेतून दिसून येते. गोळीबार केल्यावर तुषार पुंडकर कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहता कामा नये, याच हेतूने मारेकºयांनी त्यांच्यावर पाठीमागून डोक्यात, छातीत आणि त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्याकांडामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती.  मारेकºयांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके कामाला लागली होती. सर्वच प्रकारे तपास करून आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या हत्याकांडाच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ व त्यांच्या चमूने घेत, महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर या प्रकरणात अकोट येथील आरोपी पवन नंदकिशोर सेदाणी, श्याम ऊर्फ स्वप्निल पुरुषोत्तम नाठे आणि अल्पेश भगवान दुधे यांना अटक करून तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा करण्यात यश मिळविले.

सूड घेण्यासाठी पुंडकर यांची हत्या!
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा सहकाºयांनी गणेशोत्सव मंडळाच्या वादातून ११ सप्टेंबर २0१३ रोजी सरस्वती नगरातील पवन सेदाणी याचा चुलत भाऊ तेजस सुरेश सेदाणी याची धारदार शस्त्र व लोखंडी पाइपने मारहाण करून निर्घृण हत्या केली होती. या हत्येचा सूड घेण्यासाठीच आरोपी पवन सेदाणी याने तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचला आणि श्याम नाठे, अल्पेश दुधे या सहकाºयांच्या मदतीने पुंडकर यांच्यावर देशीकट्ट्यातून गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

गणेशोत्सव मंडळामुळे उद्भवला होता वाद 
मृतक तेजस सेदाणी याने काही युवकांसह शिवाजी कॉलेज रोडवर नवीन गणेश मंडळाची स्थापना केली होती. परिसरात एकच गणेशोत्सव मंडळ असावे, अशी पुंडकर यांची अपेक्षा होती. या गणेशोत्सव मंडळाला तुषार पुंडकर यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी व सहकाºयांनी तेजसची हत्या केल्याचा आरोप तेजसचे वडील सुरेश सेदाणी यांनी त्यावेळी पोलीस तक्रारीत केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com