साडेतीन वर्षांपर्यंतच्या बालकांना नर्सरीप्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - पूर्व प्राथमिकमध्ये प्रवेश देण्यासाठी 31 जुलैपर्यंतची वयोमर्यादा धरण्याची अट रद्द करून ती अट 30 सप्टेंबरपर्यंत करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षक व क्रीडा विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना मिळणार असून, पालकांना बराच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे तीन ते साडेचार वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्याला नर्सरीत प्रवेश मिळेल. 

राज्यातील पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी 31 जुलैपर्यंत तीन वर्षे पूर्ण करण्याची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे 31 जुलैनंतर जन्मलेल्या मुलाला नर्सरी प्रवेशासाठी एक वर्ष वाट बघावी लागत असे. अनेकदा शाळांमध्ये या अटीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. यासंदर्भात अनेकदा शिक्षण विभागाला पालकांचा रोष सहन करावा लागत असे. अनेकदा यासंदर्भात उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांच्या तक्रारी येत असत. अनेक शिक्षक संघटनांनीही त्यासंदर्भात शासनाकडे निवेदन सादर केले होते. एकीकडे शासन एकही मुलगा शाळेपासून वंचित राहू नये असे धोरण जाहीर करीत असताना, केवळ एक दिवस, एक महिना उशिरा जन्मलेल्या मुलाला वय कमी असल्याच्या कारणाहून प्रवेश नाकारत असल्याची टीका होताना दिसून येत होती. विशेष म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र दिल्यास ती अट 31 ऑगस्टपर्यंत शिथिल करता येत होती. मात्र, त्यात कुठल्याच प्रकारची अधिकृतता नसल्याने शाळांकडून ते पत्र बेदखल करण्यात येत होती. दरम्यान, अनेक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता 30 सप्टेंबरपर्यंत जन्मलेल्या चिमुकल्यांनाही नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. विशेष म्हणजे चिमुकल्यांचे वर्ष वाया जाणार नाही. तसेच चिमुकल्यांना सहजरीत्या प्रवेश मिळणार आहे. 

आरटीईसाठी शनिवारपर्यंत मुदत 
तीन ते साडेचार वर्षांच्या मुलाला नर्सरी, चार ते पाच साडेपाच वर्षांच्या विद्यार्थ्यांना केजी-1 मध्ये प्रवेश घेता येईल. आरटीईमध्ये अर्ज करण्याची शेवटली तारीख 25 फेब्रुवारी असून, आतापर्यंत 7 हजार 99 जागांसाठी 19 हजार 32 पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. 

Web Title: Three and a half years of the children in the nursery admission