जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

lonar lake 02.jpg
lonar lake 02.jpg

लोणार (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण भारतातील अभयारण्ये बंद आहे. काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्ती करीत असताना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करताना तिघांना अटक करण्यात आली.

या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की, लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून, त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. 

तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असताना (ता.13) मेहकर वनपरिक्षेत्रातील लोणार सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा. अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा. अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे तिघे झाडांमध्ये लपून मद्यपान करताना आढळले. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे 27 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू आहे.

मेहकर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की, कोणी ही या लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये, असे करणे गुन्हा आहे. सध्या या तलावातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करून राहीले आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा तसेच धोकादायक आहे.

कारण या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरतो आहे, त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अभयारण्यातील सर्व परिसरात ई सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाते आहे. तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल नप्ते, वनरक्षक माने, शिंदे व सरकटे यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com