esakal | रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील दांडेगाव येथे रानडुकराची शिकार करून मांस विकत असलेल्या तिघांना वनकर्मचाऱ्यांनी अटक केली.
लाखांदूर परिक्षेत्रातील दिघोरी सहवनक्षेत्रातील दांडेगाव बिट येथे मंगळवारी (ता.3) रानडुकराची शिकार करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी मांस विकत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून परिक्षेत्र अधिकारी आर. एस. दोनोडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल व्ही. बी. पंचभाई, क्षेत्रसहायक जे. के. दिघोरे, आर. ओ. दशरिया, वनरक्षक बी. एच. गजापुरे व कर्मचाऱ्यांनी दांडेगाव येथे छापा टाकला. यात आरोपी शिवा गोविंदा शेंडे, ईश्‍वर किसन शेंडे आणि नानाजी मोतीराम कुळसुंगे हे मांस विक्री करताना आढळले. त्यांच्याकडून वनकर्मचाऱ्यांनी रानडुकराचे मांस, तराजू, वजनकाटा, चाकू, सुरी, दोन सायकली असे साहित्य जप्त केले आहे.
आरोपींना वनकायद्यानुसार अटक करून लाखांदूर येथे न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक वनसंरक्षक बी. डी. चोपकर यांच्या मार्गदर्शनात प्रकरणात तपास सुरू आहे. या तपासात वनरक्षक जी. डी. हात्ते, पी. बी. ढोले, एम. ए. भजे, चालक प्रफुल्ल राऊत यांचा सहभाग होता.

loading image
go to top